Join us
Daily Top 2Weekly Top 5

"योगी आदित्यनाथ यांच्या भूमिका मला पटतात", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 17:28 IST

"पहाटेचा शपथविधी पाहून...", 'एक थी बेगम' फेम अभिनेत्रीच्या वक्तव्याने वेधलं लक्ष

मराठीबरोबरच हिंदी कलाविश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अनुजा साठे. विविधांगी भूमिका साकारुन अनुजाने मनोरंजनविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अनुजाने मालिका व चित्रपटांबरोबरच वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. 'एक थी बेगम' आणि 'महाराणी' या वेब सीरिजमध्ये तिने साकारलेल्या भूमिकांचं कौतुकही करण्यात आलं होतं. 

अनुजा साठेच्या पॉलिटिकल ड्रामा असलेल्या 'महाराणी' या वेब सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने तिने नुकतीच चित्रपट समीक्षक सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' पोडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत अनुजाला सध्याच्या राज्यातील घडामोडींवर प्रश्न विचारण्यात आला. "महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल विचार करताना काय डोक्यात येतं?" असा प्रश्न तिला विचारला गेला. यावर उत्तर देत अनुजा म्हणाली, "मला यामध्ये रस नाही.त्यामुळे मी विचारच करत नाही."

"वहिनींना नमस्कार", सोहम बांदेकरचा 'त्या' मुलीबरोबरचा फोटो व्हायरल, अभिनेता म्हणाला...

"सध्या जे काही चाललंय त्याची आपण फक्त मजाच घेऊ शकतो.  गेले काही दिवस ज्या घडामोडी सुरू आहेत...हे सगळं बघून मला खूप हसू येतं. पहाटेचा शपथविधी पाहूनही मला हसू आलेलं. मी नोटाला वोट करते. माझ्यासाठी सगळे एकाच माळेचे मणी आहेत," असंही ती म्हणाली. "आता कोणाची गरज आहे, असं तुला वाटतं," असा प्रश्नही अनुजाला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना तिने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं. "मला माहीत नाही. पण त्यातल्या त्यात मला योगी आदित्यनाथ यांच्या भूमिका कट्टर असूनही त्यांचे विचार पटतात,"असंही तिने सांगितलं.

'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर 'आई कुठे...' फेम अरुंधती भारावली, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

अनुजा साठे महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या 'महाराणी' या वेब सीरिजचा तिसरा सीझन ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये सोहम शाह, हुमा कुरेशी, नेहा चौहान हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

टॅग्स :मराठी अभिनेतायोगी आदित्यनाथवेबसीरिज