Amruta Khanvilkar: मराठी सिनेसृष्टीतील चंद्रमुखी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar). आपल्या अभिनयाने आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी ही अभिनेत्री चाहत्यांची लाडकी आहे. नुकतीच अमृता खानविलकरकेदारनाथ यात्रेला गेली होती. याचे फोटो शेअर करत तिने आपला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला होता. मात्र, आता केदारनाथहून परतल्यानंतर अमृताची तब्येत बिघडली आहे. सोसल मीडियावर याबाबत व्हिडीओ पोस्ट करत तिने चाहत्यांना माहिती दिली आहे.
अमृता खानविलकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ पोस्ट शेअर करत चाहत्यांना खास सल्ला दिला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या हाताला सलाइनसाठी लावलेली IV दिसत आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणते, "हॅलो, नमस्कार. तर मी काल केदारनाथहून परत आले आहे. आणि आज मला हे झालं आहे. गेले दोन ते तीन दिवसांपासून मला बरं वाटत नाही आहे, त्रास होत आहे. पण डोलो गोळी खाऊन मी काम चालवत होते. केदारनाथला जाऊ इच्छिणाऱ्यांना मी हे सांगते की, समुद्राच्या उंचीपासून ११ हजार फुटावर हे देवस्थान आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला समजण्याची गरज आहे. तुम्ही तिथे जाणार असाल तर तिथल्या वातावरणाची आधी तुमच्या शरीराला सवय करुन घ्या. कारण माझ्या शरीराला तिथलं वातावरण पटकन सहन झालं नाही".
त्यानंतर पुढे ती म्हणाली, "जेव्हा मी खाली उतरत होते तेव्हा हालत खराब झाली. शेवटच्या चार किलोमीटरवर तर माझ्या पायाचे लचकेच पडले होते. अंगदुखी वगैरे आता कमी झालं आहे. पण मला Mountain sickness म्हणतात ना बहुतेक ते मला झालं आहे. तुम्हीही तिथे जाण्याचा प्लॅन करत असाल तर सगळी औषधं घेऊन जा, ORS घेऊन जा. घाईगडबडीमध्ये ही ट्रीप करायला जाऊ नका. तिथे पोचल्यानंतर शांतपणे एक दिवस घालवा. तिथे फिरा, कॉफी प्या. जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. दुसऱ्या दिवशी मग दर्शन घ्या".
तिकडचं वातावरण फार वेगळंच आहे...
"दर्शनानंतर तिथे थांबा आणि नंतरच खाली उतरा. आम्ही नशिबवान आहोत की, आम्हाला पाऊस लागला नाही, कुठलीच दगदग झाली नाही. पण, तिथलं वातावरण वेगळंच आहे. समुद्रापासून इतक्या उंचीवर जाणं आणि तिथे गेल्यानंतर आपल्यासाठी ते अशक्य असतं. म्हणजे मी तिथे जाण्यापूर्वी एक आठवडा तरी ५ ते ६ किलोमीटर चढ चढत होते. पण तिकडे जाऊन वातावरण कधी बदलेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. तिकडचं वातावरण फारच वेगळं आहे. असं म्हणत अभिनेत्रीचा तिचा अनुभव शेअर केला.