Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेत कामाला होते ऐश्वर्या नारकर यांचे वडील, चाळीत राहायची अभिनेत्री, म्हणाल्या- "चाळीत राहिल्यामुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:13 IST

सोशिक संस्कारी नायिका ते खलनायिका अशा विविधांगी भूमिका त्यांनी पडद्यावर उमटवल्या. प्रत्येक भूमिकेत त्यांना प्रेक्षकांनी पसंत केलं. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या ऐश्वर्या आज लोकप्रिय अभिनेत्री आहेत. 

ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. गेली कित्येक वर्ष त्या चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माधम्यातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सोशिक संस्कारी नायिका ते खलनायिका अशा विविधांगी भूमिका त्यांनी पडद्यावर उमटवल्या. प्रत्येक भूमिकेत त्यांना प्रेक्षकांनी पसंत केलं. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या ऐश्वर्या आज लोकप्रिय अभिनेत्री आहेत. 

ऐश्वर्या नारकर यांनी नुकतीच लोकशाही या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या ऐश्वर्या या चाळीत राहायच्या. त्यांचे आई वडील दोघेही नोकरी करत होते. त्यांचे वडील रिझर्व्ह बँकेत कामाला होते, असं त्या म्हणाल्या. "आमची मध्यमवर्गीय फॅमिली...आई बाबा आणि मी असं कॉम्पॅक्ट कुटुंब. बाबा रिझर्व्ह बँकेत सर्व्हिसला होते आणि आईसुद्धा नोकरी करायची. त्यामुळे माझी रवानगी आत्याकडे असायची". 

"आत्या चाळीत राहायची. तिच्या चाळीपुढे शेत होतं. त्या शेतात आम्ही खेळायचो. बांधावर खेळायचो, लपाछपी खेळायचो. आमचं घरही चाळीतच होतं. आमचं कुटुंब जरी छोटं असलं पण चाळीत राहिल्यामुळे कोणाचीही दारं उघडी असायची त्यामुळे कोण कुठं जातंय. अशीच मी लहानाची मोठी झालीये. ती सुद्धा माझी फॅमिलीच होती. असंच माझं बालपण अगदी साधेपणाने गेलंय. मध्यमवर्गात वाढल्यामुळे संस्कारही तसे झाले. आणि खूप छान क्षण आहेत. माझ्या मनावर बालपण कोरलं गेलंय. सगळे सण साजरे करायचो. छोट्या छोट्या गोष्टी साजऱ्या व्हायच्या", असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :ऐश्वर्या नारकरसेलिब्रिटी