Join us

"ते दिवस पुन्हा येणे नाही...या आठवणी कायम स्मरणात राहतील..", उमेश कामतची नवी पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 17:49 IST

उमेश कामत सोशल प्लेटफॉर्मवर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या त्याची सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतेय.

मराठमोळा अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय. या चॉकलेट बॉयचे चाहतेही असंख्य. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या निमित्ताने उमेश सतत चर्चेत असतो. सोशल मीडियावर सध्या त्याची एक पोस्ट चर्चेत आहे,

उमेश कामत सोशल प्लेटफॉर्मवर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत देखील तो माहिती देत असते. घरची साफसफाई करताना दिसला, घरी आलेला पहिला VCR आणि VHS. माझ्या पहिल्या काही मालिका, कार्यक्रम आई बाबांनी प्रेमाने, कौतुकाने यात record करून ठेवले. ते दिवस पुन्हा येणे नाही. पण या आठवणी कायम स्मरणात राहतील.अशी पोस्ट उमेशने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यासोबतचे त्याने काही पुस्तकांचे फोटो आणि VCRचा फोटोदेखील आहे. चाहत्यांसह सेलिब्रेटी त्याच्या या पोस्टवर कमेंट करतायेत. उमेश कामतची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

उमेशच्या ‘आणखी काय हवं’ वेबसीरिजला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला होता. यानंतर उमेश सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत दिसला. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 

टॅग्स :उमेश कामत