Join us
Daily Top 2Weekly Top 5

भावाची कार्बन कॉपी आहे सिद्धार्थ जाधव; दोघांमधलं साम्य पाहून खरा अभिनेता कोण हे ओळखणंही होतंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 11:33 IST

Siddharth jadhav: सिद्धार्थचा सख्खा भाऊ एक प्रसिद्ध डॉक्टर आहे

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav). हटके स्टाइल आणि उत्तम अभिनय यामुळे चर्चेत येणारा सिद्धार्थ सोशल मीडियावरही तितकाच अॅक्टीव्ह आहे. मराठीतला रणवीर सिंग म्हणून ओळखला जाणारा सिद्धार्थ सोशल मीडियावर कायम त्याच्या कुटुंबाशी संबंधित पोस्ट करत असतो. यावेळी त्याने त्याच्या भावासोबतचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या भावाकडे पाहिल्यानंतर ही दोन्ही भावंड अगदी हुबेहूब एकमेकांसारखी दिसत असल्याचं लक्षात येतं.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सिद्धार्थने यापूर्वी बऱ्याचदा त्याच्या आई-वडिलांसोबत, मुलींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. मात्र, यावेळी त्याने त्याच्या भावासोबतचा फोटो शेअर केला. सिद्धार्थचा भाऊ अगदी त्याच्यासारखा दिसतो. विशेष म्हणजे त्याचा दादा एक चांगला डॉक्टर आहे.

लवेश जाधव असं त्याच्या भावाचं नाव असून तो डॉक्टर आहे. लवेश जाधव सोशल मीडियावर फारसे सक्रीय नाहीत. मात्र, सिद्धार्थने त्यांचा फोटो शेअर केल्यापासून नेटकऱ्यांमध्ये त्यांची चर्चा रंगली आहे. सिद्धार्थच्या या पोस्टवर मराठी कलाकारांसह भारती सिंहपर्यंत अनेक हिंदी कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :सिद्धार्थ जाधवसेलिब्रिटीसिनेमा