Siddharth Jadhav: मराठीसह हिंदी कलाविश्वात आपली ओळख निर्माण करणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav). दरम्यान, आजवर आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनयासोबत आपल्या स्टाईलने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. त्याचा चाहतावर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने मराठी फिल्म इंडस्ट्रीतील वस्तूस्थितीवर वक्तव्य केलं आहे.
नुकतीच सिद्धार्थ जाधवने अमोल परचुरेंच्या 'कॅचअप, पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींवर भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये अभिनेता म्हणाला, "मला माझ्या मराठी इंडस्ट्रीबद्दल अभिमान आहे. मी प्रेक्षकांना अजिबात दोष देत नाही. १०१ टक्के की प्रेक्षकच येत नाही, असं नाही, मग नाटकंही नाही चालणार, प्रेक्षकवर्ग आहे फक्त तो आपआपल्या पद्धतीने सिनेमे पाहायला जातोय."
त्यानंतर अभिनेत्याने म्हटलं, "कुणाला विनोदी सिनेमा आवडत असेल तर ते तिकडे जात आहेत. कुणाला खरंच कौटुंबिक सिनेमा आवडतो, अगदी 'जुनं फर्निचर'सारखा तर लोक तिकडे जातात. म्हणजे एक नट म्हणून मी हे सांगतो. त्यानंतर सिद्धार्थ जाधव एक उदाहरण देत म्हणाला, "पण, हेही तितकंच खरं की लोकांना आवडू नये म्हणून लोकं सिनेमे बनवतात का तर नाही बनवत." असा खुलासा अभिनेत्याने केला.