Join us

चक्क स्मशानात वडिलांकडे मागितला मुलीचा हात, मराठी अभिनेत्याच्या लग्नाची भन्नाट स्टोरी

By देवेंद्र जाधव | Updated: April 7, 2025 15:50 IST

धूमधडाका, अष्टविनायक सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेत्याने चक्क स्मशानात लग्नाची मागणी घातली होती. हसून हसून पोट दुखवणारा किस्सा नक्की वाचा

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणजे शरद तळवलकर.  शरद तळवलकर (sharad talwalkar) यांनी 'धूमधडाका', 'अष्टविनायक',  'मुंबईचा जावई', 'लाखाची गोष्ट' अशा सुपरहिट मराठी सिनेमांमधून काम केलं. शरद तळवलकर यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मोठ्या पडद्यावर विनोदी भूमिका साकारणारे शरद तळवलकर खऱ्या आयुष्यातही मिश्किल होते. शरद तळवलकर यांच्या लग्नाची अशीच गंमतीशीर स्टोरी

स्मशानात घातली लग्नाची मागणी

१९५० च्या काळात शरद तळवलकर पुणे विद्यापीठात कुलगुरुंचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत होते. याशिवाय ते एस.पी. कॉलेजमध्ये नाटकं आणि एकांकिकांचं दिग्दर्शन करायचे. त्यातूनच त्यांची उषा वाटवे यांच्याशी ओळख झाली. उषा ही एस.पी. कॉलेजमधील प्राध्यापकांची मुलगी. शरद आणि उषाची ओळक झाली मग पुढे या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मुलीच्या वडिलांना लग्नाबद्दल कसं सांगायचं? हा मोठा शरद यांच्याकडे प्रश्न होता. उषा यांनी शरद यांना सल्ला दिला की, "माझे बाबा जेव्हा शांत असतील तेव्हा तू त्यांच्यासमोर लग्नाचा विषय काढ." काही दिवसांनी उषा यांची आई वारली. तेव्हा शरद स्मशानभूमीत गेले. बायको गेल्यामुळे उषा यांचे वडील शांत उभे असल्याचं त्यांनी पाहिलं. शरद हळूच वडिलांजवळ गेले आणि त्यांच्या कानात म्हणाले, "मला तुमची मुलगी आवडते. आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम असून आम्हाला लग्न करायचं आहे."

त्यानंतर उषा यांच्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल माहित नाही. पण पुढे २० ऑक्टोबर १९५० रोजी शरद आणि उषा यांचा विवाह झाला. लग्नानंतर उषा यांची पूर्णिमा तळवलकर झाली. उषा वाटवे या उत्तम शास्त्रीय गायिका होत्या. "जिथे लोकांचे संसार मोडतात तिथे माझा संसार सुरु झाला.", असं शरद गंमतीने सांगतात. स्मशानभूमीत मुलीचा हात मागणारे शरद तळवलकर हे जगातील पहिले आणि शेवटचे व्यक्ती असावेत.

टॅग्स :मराठी अभिनेतामराठीमराठी चित्रपट