Join us

14 रुपयांना कोथिंबीर विकणारा तरूण भाजी विक्रेता नसून आहे मराठी कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 18:07 IST

एका भाजी विक्रेताचा कोथिंबीर विकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका भाजी विक्रेत्याचा हा व्हिडिओ आहे. लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला हा तरुण दोन्ही हातात कोथिंबिरीच्या जुड्या घेऊन गाणं गात आणि हटके डान्स करत पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात भाजी विकत होता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, त्याला आता ‘सेल्समन ऑफ द ईअर’म्हटले जात आहे. विशेष म्हणजे हा भाजी विक्रेता एक मराठी अभिनेता आहे. त्याचो नाव आहे रोशन शिंगे.रोशन शिंगेचे भाजी विकतानाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. खरेतर रोशन हा भाजी विक्रेता नाही, रोशन हा एक कलाकार आहे. तो मुबंईच्या विक्रोळी येथील टागोरनगर या विभागात राहतो. पुण्यात एका सिनेमाच्या शोसाठी गेला आणि त्यातच लॉकडाऊनमध्ये तिथेच अडकला. तो सध्या पुण्यामध्ये आपल्या बहिणीकडे राहतो आहे.

लॉकडाऊनमध्ये जगण्यासाठी काय करावे, असा विचार त्याने केला आणि थेट भाजी विकायला सुरूवात केली. भाजी विकताना देखील त्याच्यातला कलाकार काही शांत बसला नाही.

भाजी विकताना त्याने आपल्या कलाकारीचा चांगलाच उपयोग केला आहे.