Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हर कुत्ते का दिन आता हैं'; प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 15:17 IST

Prasad Oak: प्रसादने या पोस्टला दिलेलं हे कॅप्शन पाहून अनेक जण चक्रावून गेले आहेत. त्यामुळे नेमकं काय झालंय असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) याचा गेल्या काही काळापासून सोशल मीडियावरील वावर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे तो कायम या ना त्या मार्गाने चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. विशेष म्हणजे प्रसादच्या प्रत्येक पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते. यावेळीदेखील त्याची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

अलिकडेच प्रसादने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्याने 'हर कुत्ते का दिन आता हैं', असं कॅप्शन दिलं आहे. अनेक जण हे कॅप्शन पाहून चक्रावून गेले आहेत. त्यामुळे नेमकं काय झालंय असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

हा व्हिडीओ नीट पाहिल्यावर लक्षात येईल की प्रसादने दिलेलं कॅप्शन कोणा व्यक्तीसाठी नसून त्याच्या लाडक्या श्वानासाठी आहे. नुकताच त्याने मस्करासोबत डेआऊट केलं. यावेळी त्याने मस्कराला स्विमिंगसाठी नेलं होतं. येथील हा व्हिडीओ त्याने पोस्ट केला असून हे कॅप्शनदेखील त्यासाठीच आहे.

दरम्यान, मस्करा हे प्रसाद ओकच्या श्वानाचं नाव असून पोटच्या पोराप्रमाणे ते या श्वानावर प्रेम करतात. इतकंच नाही तर मस्कारचं इन्स्टाग्राम अकाऊंटदेखील आहे. ज्यात त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ पाहायला मिळतात. 

टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटी