Join us

मला तुझ्याकडून काहीच नको...भरत जाधवने पंढरपूच्या पाडुंरंगला घातली भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 15:32 IST

शल मीडियावर भरत जाधवच्या पोस्ट व्हायरल होत असतात. भरतने पढंरपूरच्या विठू रायाला साद घातली आहे

मराठीतील सुपरस्टार असं ज्यांना म्हटलं जातं ते अभिनेते म्हणजे भरत जाधव(bharat jadhav) . आपल्या अभिनयाने भरत जाधव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. चित्रपट, रंगभूमी किंवा छोटा पडदा या तिन्ही माध्यमांमध्ये भरत जाधव यांनी आपल्या अभिनयाचा डंका वाजवल्याचे पाहायला मिळत आहे. तिन्ही माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत भरत जाधव यांनी आपल्या अभिनय कौशल्यातील अष्टपैलूत्व दाखवलं आहे. सोशल मीडियावर भरत जाधवच्या पोस्ट व्हायरल होत असतात. भरतने पढंरपूरच्या पाडुंरंगला साद घातली आहे

सर्वसामान्यापासून ते कलाकारापर्यंत प्रत्येकाला विठुरायच्या दर्शनाची ओढ लागली आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी चालत पंढपुरात दाखल होत आहेत. टाळ-मृदूंगाच्या गजरात प्रत्येक वारकरी न्हाऊन निघाला आहे. भरतने ही पढंरपूरच्या पाडुंरंगला साद घातली आहे. मला तुझ्याकडून काहीच नको...मला तू दिलेले चिरंतन देणे वेगळेच आहे..!!  नको तुझे ज्ञान नको तुझा मान। माझें आहे मन वेगळेंची।।१।। नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ती। मज आहे विश्रांती वेगळीच।।२।। चरणी ठेऊनी माथा विनवितो सावता। ऐका पंढरीनाथा विज्ञापना।।३।। 

सर्वसामान्यापासून ते कलाकारापर्यंत प्रत्येकाला विठुरायच्या दर्शनाची ओढ लागली आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी चालत पंढपुरात दाखल होत आहेत. टाळ-मृदूंगाच्या गजरात प्रत्येक वारकरी न्हाऊन निघाला आहे. 

दरम्यान, भरत जाधव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने जत्रा, वन रूम किचन, पछाडलेला, खबरदार, बकुळा नामदेव घोटाळे, हसा चकट फु, सही रे सरी अशा किती नाटक, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ऑल द बेस्ट या नाटकाच्या भरघोस यशानंतर भरत खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला.

टॅग्स :भरत जाधवसेलिब्रिटीपंढरपूर