Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन्वीच्या व्हिडीओवर भारतीय जवानांची कमेंट; अंशुमनच्या डोळ्यात तरळलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 17:06 IST

Anshuman vichare : वयाच्या तिसऱ्या वर्षातच अन्वी लोकप्रिय स्टारकिड झाली असून तिचा प्रत्येक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतो.

ठळक मुद्देअन्वीला मिळाली चक्क भारतीय सैनिकांकडून प्रतिक्रिया

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अंशुमन विचारे सोशल मीडियावर कायमच त्याच्या लाडक्या लेकीचे व्हिडीओ शेअर करत असतो. विशेष म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षातच अन्वी लोकप्रिय स्टारकिड झाली असून तिचा प्रत्येक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतो. परंतु, यावेळी अंशुमनने शेअर केलेल्या एका वेगळ्याच पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. अंशुमनने यावेळी अन्वीचा कोणताही व्हिडीओ शेअर केला नसून या चिमुकलीमुळे त्याचं उर अभिमानाने कशाप्रकारे भरुन आलंय हे त्याने सांगितलं आहे.

अभिनेता अंशुमन विचारेने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने अन्वीला चक्क भारतीय सैनिकांकडून प्रतिक्रिया मिळाल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्याने अन्वीचं कौतुक करण्यासोबतच भारतीय जवानांचे आभारही मानले आहेत.

"अन्वीच्या एका video वर भारतीय जवानांकडून आलेली ही comment वाचून ऊर भरून आला ,मुलं मोठी झाली की आई वडिलांचं नाव मोठं करतात. पण, माझ्या 3 वर्षांच्या बाळाने आताच ते सुखं अनुभवायला दिलंय, तिच्यावर इतकं प्रेम करण्यासाठी आणि तिला इतके आशीर्वाद देण्यासाठी मी आणि तिची आई तुम्हां सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो, असं कॅप्शन अंशुमनने शेअर केलेल्या पोस्टला दिलं आहे. सोबतच त्याने भारतीय जवानांकडून आलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

बस्स मोहब्बत हैं आपसे! सिद्धार्थ जाधवचा लेकीसोबतचा हा व्हिडीओ एकदा पाहाच 

काय आहे भारतीय जवानांनी दिलेली कमेंट?

"अन्वी, बाळा तुला आम्ही भारतीय सैन्यातील जवान सिमेवर बसुन बघतो. खुप छान आणि गुणी बाळ आहेस. अशीच हसत खेळत राहा. काळजी घे. जय हिंद."

अंशुमनने दिला हा रिप्लाय

"बापरे ही comment वाचून किती आनंद झाला आमच्या सर्व family ला हा शब्दांत नाही सांगू शकत, खूप खूप धन्यवाद आणि अन्वीला तुमचे आशीर्वाद मिळाले ह्या पेक्षा मोठं भाग्य काय असू शकत, खूप मनापासून आभार, जय हिंद."

टॅग्स :अंशुमन विचारेसेलिब्रिटी