Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी कधीच confuse होत नाही कारण …',अमेय वाघची भन्नाट पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:17 IST

अमेय जितका उत्तम अभिनेता आहे, तितका उत्तम विनोदबुद्धी असलेला माणूस आहे. त्याच्या विनोदबुद्धीची साक्ष देणारी अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय.

अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh ) याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरातल्या तरूणाईला अमेय वाघची ओळख झाली. पुढे फास्टर फेणे, मुरांबा यासारख्या त्याच्या मराठी सिनेमांनी प्रेक्षकांना वेड लावलं आणि नंतर वेबसीरिजमधून त्याने हिंदी मनोरंजन क्षेत्रातही पदार्पण केलं. अमेय जितका उत्तम अभिनेता आहे, तितका उत्तम विनोदबुद्धी असलेला माणूस आहे. त्याच्या पोस्ट वाचल्यावर तुम्हालाही हे पटेल. त्याच्या विनोदबुद्धीची साक्ष देणारी अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय.

अमेय वाघने हॉटेलमध्ये बसलेला एक फोटो शेअर केला आहे. यात त्याच्या हातात मेनू कॉर्ड दिसतेय. पण या फोटोपेक्षा त्याने दिलेली कॅप्शन भन्नाट आहे.

मी restaurant मध्ये order देताना कधीच confuse होत नाही कारण ….मी उजवीकडून menu card वाचतो! ’ असं भारी कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भरभरून कमेंट्स केल्या आहेत. हुश्शार आणि पुण्याचा मुलगा असं एकीने म्हटलं आहे. ‘ मी पण हॉटेल मध्ये गेल्या वर कधीच confuse होत नाही कारण कितीही ठरवून गेलो कि आज काही वेगळं खायचं शेवटी "काजू मसाला आणि पनीर" च order करतो, असं एका चाहत्याने लिहिलं आहे. मला वाटलं तीथंही नव्या प्रोजेक्टची स्क्रिप्ट घेऊन बसलास की काय... अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. ‘

अमेय वाघच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही त्याची मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. मुरांबा, फास्टर फेणे, धुरळा, झोंबिवली यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं देखील कौतुक झाले होते.

टॅग्स :अमेय वाघसिनेमा