Join us

अमेय वाघ का सांगतोय सुचवा मुलीसाठी नाव... आहे का त्याच्याकडे गुड न्यूज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 13:13 IST

अमेयची ही पोस्ट पाहून त्याच्याकडे काही गुड न्यूज आहे का हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे

ठळक मुद्देया फोटोत अमेय तोंडावर बोट ठेवून काहीतरी विचार करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या फोटोसोबत अमेयने जे काही लिहिले आहे, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, जरा मदत हवीये तुमची! मुलीसाठी नाव सुचवा प्लीज!

अमेय वाघने नुकतीच इन्स्टाग्रामवर टाकलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या फोटोत अमेय तोंडावर बोट ठेवून काहीतरी विचार करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या फोटोसोबत अमेयने जे काही लिहिले आहे, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, जरा मदत हवीये तुमची! मुलीसाठी नाव सुचवा प्लीज!

अमेयची ही पोस्ट पाहून त्याच्याकडे काही गुड न्यूज आहे का हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे तर काहींच्या मते तो या पोस्टद्वारे त्याच्या आगामी प्रोजेक्टचे प्रमोशन करत आहे. या पोस्टवर सामान्य लोकांनीच नव्हे तर सेलिब्रेटींनी देखील आपला रिप्लाय दिला आहे. सई ताम्हणकरने मुलीसाठी आलिया हे नाव सुचवले आहे. पण त्यावर अमेयने रिप्लाय केला आहे की, त्यापेक्षा अलिशा हे नाव कसे वाटते. तर मुरांबा या चित्रपटातील त्याच्या नायिकेने म्हणजेच मिथिला पालकरने इंदरायणी हे नाव ठेव असे सांगितले आहे. इंदरायणी हे मिथिलाचे मुरांबा या चित्रपटातील नाव असून या चित्रपटात अमेय साकारत असलेले पात्र आणि इंदरायणी यांच्यात सतत वाद असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यामुळे मिथिलाने सुचवलेल्या नावावर उत्तर देताना अमेयने लिहिले आहे की, हे नाव ठेवले तर माझे भांडण देखील होईल तिच्याशी...

अप्सरा आली फेम सोनालीने सोनबाई, प्रसाद ओकने फास्टर फेणी किंवा मीरांबा तर सिद्धार्थ जाधवने आर्ची अशी मजेदार नावे देखील सुचवली आहेत. 

अमेयने जुलै 2017 मध्ये त्याची बालमैत्रीण साजिरी देशपांडेशी लग्न केले. 13 वर्षांच्या नात्यानंतर त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. अमेयने त्याच्या लग्नाची बातमी इन्स्टाग्रामद्वारेच त्याच्या चाहत्यांना दिली होती. आता अमेयने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून खरंच त्याच्याकडची गुड न्यूज सगळ्यांना सांगितली आहे की, तो त्याच्या कोणत्या आगामी चित्रपटाचे अथवा नाटकाचे प्रमोशन करत आहे हे आपल्याला काहीच दिवसांत कळेल. 

 

टॅग्स :अमेय वाघसई ताम्हणकरमिथिला पालकरप्रसाद ओक सिद्धार्थ जाधवसोनाली कुलकर्णी