Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानसी नाईक लवकरच अडकणार लग्नबेडीत, लग्नात दिसणार ऐश्वर्या रायच्या 'जोधा अकबर' लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 18:42 IST

अभिनेत्री मानसी नाईक येत्या १९ जानेवारीला बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत लग्नबेडीत अडकणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक येत्या १९ जानेवारीला बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत लग्नबेडीत अडकणार आहे. सध्या मानसी लग्नाच्या तयारीत व्यग्र आहे. नुकतेच तिची बॅचलर पार्टी पार पडली. त्याचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाले होते. तसेच तिने लग्नाच्या आधी काही फोटोशूट केले. ते फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर ती लग्नात कोणता लूक करणार हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

मानसी नाईकला मराठी चित्रपटसृष्टीतील ऐश्वर्या राय संबोधले जाते. तिचा लूक देखील काहीसा ऐश्वर्या सारखा आहे. त्यामुळेच कदाचित मानसीने तिच्या लग्नात ऐश्वर्याचाच एक लूक फॉलो करायचे ठरवले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या मुलाखतीत मानसीने याबाबत सांगितले आहे. मानसी नाईक ही जोधा अकबरमधील ऐश्वर्यासारखीच तिच्या लग्नात तयार होणार आहे. ती म्हणाली की, 'ऐश्वर्या ही माझी आवडती अभिनेत्री आहे. ती जशी जोधा अकबरमध्ये तयार झाली होती तसे तयार होणे हे माझे स्वप्न आहे.

मी जरी महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न करत असले तरी आम्ही लग्न राजेशाही पद्धतीच करणार आहोत.

१९ जानेवारीला मानसीचे प्रदीपसोबत विवाह पार पडणार आहे. त्यानंतर ते दोघेही प्रदीपच्या मूळ गावी फरिदाबादला रवाना होणार आहेत. मुंबईत या दोघांचे लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने होणार असून त्यानंतर फरिदाबादला प्रदिपकडील काही विधी पार पडणार आहेत.  

टॅग्स :मानसी नाईकऐश्वर्या राय बच्चन