Join us

मनवाचा ट्रॅव्हलिग लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 14:52 IST

स्टायलिश,हटके,ग्लॅमरस लूक असे विविध लूकची नावे आपण ऐकली आहेत. पण हे ट्रॅव्हलिग लूक काय असतो हा प्रश्न नक्कीच सर्वाना ...

स्टायलिश,हटके,ग्लॅमरस लूक असे विविध लूकची नावे आपण ऐकली आहेत. पण हे ट्रॅव्हलिग लूक काय असतो हा प्रश्न नक्कीच सर्वाना पडला असेलच? याच प्रश्नांचे उत्तर अभिनेत्री मनवा नाईक हिने सोशलमिडीयावर दिले आहे. तिने हे उत्तर तिच्या फोटोच्या माध्यमातून दिली आहे.त्याचबरोबर ट्रॅव्हलिग लूक हा नवीन शब्ददेखील मनवाच्या डिक्शनरीतील आहे असे वाटते. मनवाने तिच्या गाडीतील सुंदर फोटो सोशलमिडीयावर अपडेट केला आहे. या फोटोमध्ये तिने डोळयावर झक्कास गॉगल व डोक्यावर पदर घेतला असून तिने या गेटअपला ट्रॅव्हलिग गेटअप असे म्हटले आहे. मोसली, चालत्या गाडीत हवेने केस खराब होऊ नये किवा थंडी वाजवू नये म्हणून डोक्यावर पदर, ओढणी वगैरे घेतो. पण मनावने थेट या लूकला ट्रॅव्हलिग गेटअप हेच नाव दिले आहे. तिच्या या नवीन डिक्शनरीतील शब्दाला प्रेक्षकांची पसंतीस देखील मिळत आहे.