Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hruta Durgule : कलरफुल्ल!! हृता दुर्गुळेनं शेअर केले थायलंड ट्रिपचे फोटो, तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 08:00 IST

Hruta Durgule : 12 सप्टेंबरला हृताचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाचं सेलिब्रेशन कुठे झालं तर दूर थायलंडमध्ये. होय, नवरा प्रतीकसोबत ती थेट थायलंडला पोहोचली. आता या ट्रिपचे फोटो समोर आले आहेत...

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. होय, 12 सप्टेंबरला हृताचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाचं सेलिब्रेशन कुठे झालं तर दूर थायलंडमध्ये. होय, नवरा प्रतीकसोबत ती थेट थायलंडला पोहोचली. आता या थायलंड ट्रिपचे हृताचे फोटो पाहायला चाहते उत्सुक असणारच. तर ते फोटोही समोर आले आहेत. हृताने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर या ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत.शेअर केलेल्या फोटोमध्ये हृता कलरफुल अशा शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय. सध्या तिच्या या फोटोंवर  कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.  

थायलंडमधील फुकेट या सुंदर शहरात हृताने तिचा वाढदिवस साजरा केला. यानंतर ती फी फी बेटावर पोहोचली. हृता व प्रतीकचं याचवर्षी 18 मे रोजी लग्न झालं. लग्नानंतर दोघंही हनिमूनला गेले होते. आता पुन्हा एकदा हे जोडपं एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवतंय.

हृताचे अलीकडे दोन सिनेमे रिलीज झालेत. आधी ‘अनन्या’ रिलीज झाला आणि यानंतर ‘टाइमपास 3’ या चित्रपटात ती झळकली. आता तिचे आणखी दोन प्रोजेक्ट येत्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.  वाढदिवशीच हृताने ‘कन्नी’ या सिनेमाची घोषणाही केली आहे. याशिवाय महेश मांजरेकरांच्या ‘एका काळेचे मणी’ या वेब सीरिजमध्येही दिसणार आहे.  

हृता दुगुर्ळे हिने छोट्या पडद्यावर दुर्वा या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘फुलपाखरू’ या मालिकेतून. ‘मन उडू उडू झालं’ ही तिची मालिका प्रचंड गाजली.   

हृताचा नवरा प्रतीकने बेहद 2, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदडी, इक दिवाना था  या मालिकांचे दिग्दर्शन केलं आहे. प्रतिकची आई आणि हृताच्या सासूबाई मुग्धा शाह या सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहेत.  मुग्धा शाह यांनी अनेक हिंदी्र मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. बे दुणे साडे चार, मिस मॅच, माहेर माझं हे पंढरपूर, 'संभव असंभव  सारख्या चित्रपटात त्या झळकल्या आहेत. 

टॅग्स :ऋता दूर्गुळेमराठी अभिनेता