महेश मांजरेकर म्हणतात प्रेक्षकांना आवडेल तेच करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 01:34 IST
कधीही जास्त विचार करु नका. तुम्हाला माहिती आहे प्रेक्षकांना पडद्यावर काय पहायला आवडेल. ज्या गोष्टीतून ...
महेश मांजरेकर म्हणतात प्रेक्षकांना आवडेल तेच करा
कधीही जास्त विचार करु नका. तुम्हाला माहिती आहे प्रेक्षकांना पडद्यावर काय पहायला आवडेल. ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो तिच गोष्ट करा. प्रेक्षकांना नक्कीच पहायला आवडेल. याचेच एक उदहारण, किंवा पुरावा म्हणजे नटसम्राट. असे टष्ट्वीट महेश मांजरेकर यांनी नूकतेच केले आहे. आणि पुढे ते म्हणतात, अ बिग हग टू यु, एक्सेप्शनल आॅडियन्स. नटसम्राटला मिळेलेले उत्तुंग यश पाहता महेश मांजरेकरांचे हे टष्ट्वीट बरेच काही सांगुन जाते. आपला प्रेक्षकवर्ग हा चोखंदळ जरी असला तरी त्यांना कोणत्या विषयावरील चित्रपट पहायला आवडतात हे माहित असणे गरजेचे आहे. नटसम्राटमधील नाना पाटेकरांचा अभिनय किंवा तो चित्रपट ज्या पद्धतीने पडद्यावर मांडला गेलाय ते पाहता मांजरेकरांना नक्कीच प्रेक्षकांची चॉईस कळली असावी असे म्हणायला हरकत नाही. }}}}