Join us

महादू या चित्रपटाच्या लेखिका ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेता देवी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 17:28 IST

प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका महाश्वेता देवी यांचे गुरुवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्कारने ...

प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका महाश्वेता देवी यांचे गुरुवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय पद्मविभूषण, मॅगसेस पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आले होते. कोलकात्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाश्वेतादेवी यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित म्हादू हा मराठी चित्रपट 2014साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सारंग साठ्ये, राजकुमार तांगडे, वीणा जामकर, कैलास वाघमारे, शशांक शेंडे, देविका दफ्तरदार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कोरकू या मागासलेल्या जमातीच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट होता. मेळघाटात राहाणाऱ्या या आदिवासी जमातीत कुपोषण ही मोठी समस्या आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर या जमातीचा विश्वास नसल्याने डॉक्टर, उपचार या सगळ्या गोष्टी त्यांच्यापासून प्रचंड दूर आहेत. याच त्यांच्या जीवनावर या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक संदेश भंडारे यांनी प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटाची कथा ही महाश्वेतादेवी यांची असल्याने हा चित्रपट बनवण्यापूर्वी संदेश भंडारे महाश्वेतादेवी यांनी भेटायला गेले होते. त्यांना संदेश यांनी रॉयल्टीच्या रक्कमेबाबत विचारले असता त्यांनी केवळ एक रुपयाची मागणी केली होती. त्यांनी मागितलेली ही रक्कम ऐकून मला धक्काच बसला होता असे संदेश यांनी सांगितले होते. तरीही संदेश यांनी या कथेसाठी 21000 रुपये दिले होते. अमोल धोंडगे याने या चित्रपटात म्हादू ही प्रमुख भूमिका साकारली होती.