Join us
Daily Top 2Weekly Top 5

मला भयंकर धमक्या येत आहेत..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 15:25 IST

प्रियदर्शनी इंदलकरला धमक्यांचे फोन आल्याने चर्चांना उधाण आलंय

प्रियदर्शनी इंदलकर ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेत्री. प्रियदर्शनीला आपण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये विविध भूमिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. प्रियदर्शनी सोशल मीडियावर विविध विषयांवर तिचं मत व्यक्त करत असते. प्रियदर्शनीने नुकतंच तिला धमक्यांचे फोन येत असल्याचा धक्कादायक खुलासा केला.

प्रियदर्शनी इंदलकरने काही दिवसांपुर्वी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला होता. प्रियदर्शनीला याचसंदर्भात आता धमक्यांचे फोन येत असल्याचा खुलासा तिने केलाय. प्रियदर्शनीने सोशल मीडियावर पोस्ट केलीय की, "ललित कला केंद्रावरील हल्ल्यावर मी एक भूमिका व्यक्त केल्याबद्दल गेले ३-४ दिवस मला अनेक भयंकर मेसेजेस, कमेंट्स आणि काही धमक्या येत आहेत. पुढे प्रियदर्शनीने एका व्यक्तीची पोस्ट वाचण्याचे आवाहन केलंय."

पुण्यातील ललित कला केंद्रात शुक्रवारी २ फेब्रुवारीला ललित कला केंद्रात मोठा राडा झाला. रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित 'जब वी मेट' नावाच्या नाटकाचा प्रयोग सुरु होता. त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटकाचा प्रयोग बंद पाडला. आणि दुसऱ्या दिवशी तोडफोड करण्यात आली. या हल्ल्याचा हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरने निषेध व्यक्त केला होता.