मधुरा देशपांडे सांगते, फोटोसेशन करण्यास संधी शोधते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 13:48 IST
हल्ली प्रत्येक व्यक्ती ही फोटोसेशनच्या प्रेमात पडलेली पाहायला मिळत आहे. त्यामध्ये सेल्फी हा प्रकार प्रत्येक व्यक्तीच्या अगदी जवळचा वाटत ...
मधुरा देशपांडे सांगते, फोटोसेशन करण्यास संधी शोधते
हल्ली प्रत्येक व्यक्ती ही फोटोसेशनच्या प्रेमात पडलेली पाहायला मिळत आहे. त्यामध्ये सेल्फी हा प्रकार प्रत्येक व्यक्तीच्या अगदी जवळचा वाटत आहे. जेथे जाऊ तिथे सेल्फी काढू हा प्रत्येकाच्या जगण्याचा नियमच बनला आहे. यामध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकारदेखील मागे पडले नाहीत. मात्र फोटोसेशन हा कलाकारांचा कामाचा भाग असला तरी, अभिनेत्री मधुरा देशपांडे हिला फोटोसेशन करण्यास फार आवडत असल्याचे तिने लोकमत सीएनएक्सला सांगितले. मधुरा सांगते, मला लहानपणापासूनच फोटो काढण्यास फार आवडते. नवीन कपडे घातले की, फोटोची पोझ देण्यास तयार असायचे. त्यात आता फोटोसेशन हा कामाचा भाग म्हणजे मी अधिकच आनंदित होते. त्याचबरोबर फोटो काढण्यास मी फक्त संधी शोधत असते. प्रत्येकाला कामातून थोडा रिलीप मिळावा म्हणून कोणी वाचन, डान्स, म्युझिक, ड्रायव्हिंग करण्यास पसंती देत असतात. मात्र मला फोटोसेशन केल्याने कामातून रिलीप मिळत असतो. आम्ही फ्रेंड्स कुठे एकत्रित भेटलो की, पहिले काहीतरी विविध युक्त्या लढवून छान फोटोसेशन करत असतो. त्याचप्रमाणे नवनवीन लूकचे प्रयोग करून असे फोटोसेशन मी नेहमीच करत असते. या अभिनेत्रीने नुकतेच सोशलमीडियावर एक झक्कास फोटो अपलोड केला आहे. हा तिचा फोटो खूपच हटके असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. तसेच तुझा हा फोटो पाहून अभिनेत्री स्मिता पाटीलचा भास होतोय असे म्हणत तिच्या या फोटोचे कौतुकदेखील सोशलमीडियावर करण्यात आले आहे. मधुराने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. सध्या तिचे बसस्टॉप, एफ्यू हे दोन आगामी चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज झाले आहे. आता ती येथेच टाका तंबू या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.