Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्या बात! मराठी सेलिब्रिटी कपलचा योगा पाहून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 11:58 IST

मराठी सेलिब्रिटींचा थक्क करणारा योगा! व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

अनेक सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. कलाकारांना त्यांच्या फिटनेसचीही अत्यंत काळजी घ्यावी लागते. यात बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच मराठी सेलिब्रिटीही मागे नाहीत. काही सेलिब्रिटी फिटनेससाठी योगाला पसंती देताना दिसतात. अनेकदा सेलिब्रिटी योगा करतानाचे व्हिडिओ शेअर करत योगाचं महत्त्वही पटवून देतात. अशाच एका मराठमोळ्या सेलिब्रिटी जोडप्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

या व्हिडिओत हे कपल योगा करताना दिसत आहे. हे सेलिब्रिटी कपल दुसरे तिसरे कोणी नसून मराठी अभिनेत्री आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि तिचा पती सुप्रसिद्ध दिग्दर्शख परेश मोकाशी आहेत. मधुगंधा आणि परेश या व्हिडिओत हेडसँड करताना दिसत आहेत. त्यांचा हा योगा पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तर सेलिब्रिटींनीही या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. 

"जेव्हा योग तुम्हाला आनंद देतो! योग सकाळ-योग्य सकाळ", असं कॅप्शन देत मधुगंधाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मधुगंधा आणि परेश दोघंही फिटनेस फ्रिक आहेत. मधुगंधाने मालिकांमध्ये काम करण्याबरोबरच कथा लेखनही केलं आहे. तर परेश मोकाशी यांनी अनेक सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :परेश मोकाशी मराठी अभिनेतायोगासने प्रकार व फायदे