Join us
Daily Top 2Weekly Top 5

'घनचक्कर' चित्रपटातील अशोक सराफांची अभिनेत्री पहा आता कशी,हिंदीमध्येही आहे तितकीच फेमस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 09:00 IST

'मिसेस तेंडुलकर', 'कोई अपना सा', 'ऐसा कभी सोचा न था', 'एक सफर', 'बसेरा', 'बाबा ऐसो वर ढुंडो', 'ढुंड लेंगी मंजिल हमें', 'कहीं तो होगा' अशा एकामागून एक हिंदी मालिकांमधून विविध भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.

गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि अभिनयाचे सम्राट अशी मराठी रसिकांनी ज्यांना उपाधी दिली ते म्हणजे अभिनेता अशोक सराफ. मराठी, हिंदी सिनेमासह मालिका आणि नाटक अशा विविध माध्यमांमध्ये अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता फार सिनेमात ते झळकत नसले तरी त्यांचे गाजलेले सिनेमा आजही रसिकांच्या लक्षात आहेत. ९० च्या दशकात“घनचक्कर” हा त्यांचा गाजलेला सिनेमा. सिनेमाला रसिकांची प्रचंड पसंती मिळाली होती. 

अशोक सराफच नाहीतर इतर कलाकारांनाही अमाप लोकप्रियता मिळाली होती. सिनेमात अशोक सराफ यांची अभिनेत्री माधवी गोगटेहीनेही रसिकांची पसंती मिळवली होती. मराठी सिनेमा, मालिका तसेच नाटकांतून माधवी गोगटे यांच्या भूमिकांना विशेष पसंती मिळाली होती. माधवी आज हिंदी मालिका विश्वात प्रचंड फेमस आहेत. हिंदीमध्ये त्यांना खूप चांगल्या ऑफर्स मिळत गेल्या. 

'मिसेस तेंडुलकर', 'कोई अपना सा', 'ऐसा कभी सोचा न था', 'एक सफर', 'बसेरा', 'बाबा ऐसो वर ढुंडो', 'ढुंड लेंगी मंजिल हमें', 'कहीं तो होगा' अशा एकामागून एक हिंदी मालिकांमधून विविध भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.हिंदी मालिका विश्वासत स्थिरावलेल्या माधवी यांनी मध्यंतरी कामाची गरज असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टची दखल घेत त्यांना मराठी मालिकेत कामाची संधी मिळाली.  “तुझं माझं जमतंय'' मालिकेत त्या झळकल्या.श्रीमती नगरकरची भूमिका त्यांनी साकारली आहे. मालिकेतील पम्मी म्हणजेच अपूर्वा नेमळेकरसोबतची त्यांची नोकझोक पाहायला मिळाली होती. 

माधवी गेल्या कित्येक वर्षांपासून रसिकांचे मनोरंजन करत आहेत. वयाच्या ५३ व्या वर्षीही त्या तितक्याच फिट एंड फाईन दिसतात. भूमिकेनुसार त्यांच्या लूक चेंज होत असला तरी खऱ्या आयुष्यात त्या दिसायला फार सुंदर दिसतात. वयानुसार त्यांच्या लूकमध्ये बदल झाला असला तरी पूर्वीसारख्याच सुंदर आजही त्या दिसतात. त्यांचे इंटरनेटवर सध्याचे फोटोही व्हायरल होत असतात. या फोटोंनाही चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत असते.  

 

टॅग्स :अशोक सराफ