Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधव देवचक्के एफयूमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 15:22 IST

सध्या महेश मांजरेकर दिग्दर्शित एफ्यू या चित्रपटाची चर्चा खूपच रंगू लागली आहे. या चित्रपटात एक से एक तरूण कलाकार ...

सध्या महेश मांजरेकर दिग्दर्शित एफ्यू या चित्रपटाची चर्चा खूपच रंगू लागली आहे. या चित्रपटात एक से एक तरूण कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुरूवातीला या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसर दिसणार असल्याने या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. यानंतर या चित्रपटात संस्कृती बालगुडे, माधुरी देसाई, मधुरा देशपांडे, सत्या मांजरेकर या कलाकारांचा समावेश आहे. आता या याच कलाकारांबरोबर अभिनेता माधव देवचक्केदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. माधव सध्या सरस्वती या मालिकेतून प्रेक्षकांना दिसत आहे. या मालिकेतील त्याच्या कान्हा या भूमिकेची प्रेक्षकदेखील कौतुक करताना पाहायला मिळत आहेत. माधव अनेक मालिका व चित्रपट केले आहेत. तसेच त्याने काही हिंदी मालिकादेखील केल्या आहेत. आता महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात तो हटक्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. माधवला मोठा प्रोजेक्ट असल्याने माधवदेखील आनंदित असल्याचे समजत आहे. कारण प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की, महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी माधवची ही इच्छा एफ्यू या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण मुंबईसह परदेशातदेखील पूर्ण झाले आहे. या चित्रपटात सैराट या चित्रपटातील परशा म्हणजेच आकाश ठोसर असल्याने  या चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढली आहे. कारण आकाशने सैराट या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच आकाश या चित्रपटात नक्की कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार याच्या प्रतिक्षेतदेखील त्याचे चाहते दिसत आहेत. त्याचबरोबर महेश मांजरेकर यांचा चित्रपट असल्यामुळे हा चित्रपटदेखील नक्कीच कल्ला करणार असे वाटत आहे.