मेड इन महाराष्ट्र चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 17:22 IST
नितेश पवार दिग्दर्शित मेड इन महाराष्ट्र चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.या चित्रपटात शिवाजी शहाजी भोसले यांच्या दृष्टिकोनातून सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे. शिवाजी महाराजांच्या वेळचा काळ आणि आताची परिस्थिती किती बदलली आहे यावर एक नजर टाकण्यात आली आहे.
मेड इन महाराष्ट्र चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
नितेश पवार दिग्दर्शित मेड इन महाराष्ट्र चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.या चित्रपटात शिवाजी शहाजी भोसले यांच्या दृष्टिकोनातून सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे. शिवाजी महाराजांच्या वेळचा काळ आणि आताची परिस्थिती किती बदलली आहे यावर एक नजर टाकण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती आणि समस्या म्हणजे अल्पवयीन मुलांची कॉलेजमध्ये रॅगिंग, ड्रग्स, अपहरण, स्त्रियांचा मानसिक-शारिरीक छळ, बलात्कार, खूण आदी. या चित्रपटात पोलिसांनी तरुण पीढींना एक सामाजिक संदेश दिला आहे. विलास-अरुण आणि सुभाष-सचिन यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, अभिजीत कोसंबी, नेहा राजपाल, ह्रषिकेश रानडे आणि सचिन मालप यांनी या चित्रपटाती गाणी गायली आहेत.