'मेड फॉर इच अदर' कपल संग्राम आणि पल्लवीने साजरी केली 1st Wedding Anniversary, बघा लग्नाचा अल्बम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 11:06 IST
छोटा पडदा असो किंवा मग किंवा मोठा पडदा किंवा रंगभूमी... कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. ...
'मेड फॉर इच अदर' कपल संग्राम आणि पल्लवीने साजरी केली 1st Wedding Anniversary, बघा लग्नाचा अल्बम
छोटा पडदा असो किंवा मग किंवा मोठा पडदा किंवा रंगभूमी... कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. एकत्र काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक छोट्या पडद्यावरील जोडी म्हणजे संग्राम समेळ आणि पल्लवी पाटील. गेल्या वर्षी संग्राम आणि पल्लवी रेशीमगाठीत अडकले. त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. 'रुंजी' या मालिकेतून रसिकांच्या मनावर रुंजी घालत पल्लवी घराघरात पोहचली. आपल्या अभिनयाने तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे संग्राम समेळने 'पुढचं पाऊल' मालिकेतून रसिकांची मनं जिंकली आहेत. पल्लवी आणि संग्राम एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यावेळी संग्रामच्या घरी मुली पाहण्याचे कार्यक्रम सुरु झाले होते. अशातच दोघं एके दिवशी आऊटिंगला गेले. त्यावेळी दोघांनाही क्लिक झालं की आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत. दोघांनी एकमेकांशी लग्न केलं तर असा विचार त्यांच्या मनात आला. हीच बाब लागलीच दोघांनी आपापल्या घरी सांगितली. (Also Read:मराठी चित्रपटसृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात,समोर आले लग्नाचे INSIDE PHOTOS) मियाँ बिवी राजी...या उक्तीनुसार संग्राम आणि पल्लवी लग्नासाठी तयार असताना घरच्यांचा विरोधाचा प्रश्नच नव्हता. त्यांनी तात्काळ याला होकार दिला आणि संग्राम-पल्लवी अवघ्या ८ दिवसांत रेशीमगाठीत अडकले.लग्नानंतर दोघं हनीमूनसाठी थायलंडला गेले होते. छोट्या पडद्यावरील या रिअल लाइफ कपलच्या सुखी संसाराला आता वर्ष पूर्ण झालं आहे. लग्नाच्या वाढदिवसाला तुमचा सुखी संसार असाच सुरु राहो याच संग्राम-पल्लवीला शुभेच्छा...संग्राम आणि पल्लवीने अगदी पारंपारिक रिती रिवाजाने लग्न केले आहे. पिवळ्या रंगाची सुंदर साडी, नाकातच नथ. चंद्रकोर, डोक्याला मुंडावळ्या अश रुपात सजलेली पल्लवी अतिशय सुंदर दिसत होती. पल्लवी पाटीलने रुंजी या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पल्लवी सध्या चांगलीच खूश आहे. कारण तिच्या करियरला एक चांगलेच वळण मिळाले आहे. अनेक मराठी चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रींना हिंदी मालिका, चित्रपटात काम करण्याची संधी अनेकवेळा मिळते. पण पल्लवीला थेट हॉलिवूडची लॉटरी लागली आहे. स्वोर्ड्स अँड स्केपट्रेस या चित्रपटात प्रेक्षकांना पल्लवीला पाहायला मिळणार आहे. स्वोर्ड्स अँड स्केपट्रेस हा चित्रपट झाशीच्या राणीच्या आयुष्यावर आधारित असून या चित्रपटात प्रेक्षकांना पल्लवी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.