Join us

कॉफीशॉप मध्ये काम करणारा झाला निर्माता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:44 IST

            कॉफीशॉपमध्ये काम करणारा सचिन दुबळे पाटील चक्क आता एक सिनेमा प्रोड्युस करीत आहे. ...

            कॉफीशॉपमध्ये काम करणारा सचिन दुबळे पाटील चक्क आता एक सिनेमा प्रोड्युस करीत आहे. पुण्यात एका कॉफीशॉपमध्ये काम करीत असलेल्या सचिनचे पहिले स्वप्न होते ते म्हणजे सिनेमा. काम करीत असताना तो एकदा निर्माते मेघराज राजेभोसले यांच्या संपर्कात आला अन मग तो एक्सीक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणुन काम करु लागला. बालकपालक,टाईमपास,प्रेम म्हणजे प्रेम असत,योद्धा,यलो, कापुसकोंड्याची गोष्ट यासारख्या सिनेमांसाठी देखील त्याने काम केले आहे. आटपाडी नाईट्स, बाजार, फोकस हे त्याचे आगामी चित्रपट असुन त्याच्या प्रोडक्शनचा कट्टा हा पहिला सिनेमा लवकरच येत आहे.