चिराग पाटील बनला पत्नी सनासाठी गीतकार आणि गायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 14:41 IST
अभिनेता चिराग पाटीलने गुरूपौर्णिमा, भारतीय, चार्जशीट यांसारख्या चित्रपटात तर येक नंबर या मालिकेत काम केले आहे. चिरागने व्हेलेंटाईन दिनाच्या निमित्ताने त्याची लव्ह स्टोरी शेअर केली आहे. त्याची पत्नी सनाला प्रपोज करण्यासाठी त्याने एक गाणे लिहिले होते आणि ते गायलेदेखील होते असे तो सांगतो.
चिराग पाटील बनला पत्नी सनासाठी गीतकार आणि गायक
चिराग पाटीलने गुरूपौर्णिमा, भारतीय, चार्जशीट यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या होत्या. चित्रपटांमध्ये यश मिळाल्यानंतर चिराग छोट्या पडद्याकडे वळला. त्याने येक नंबर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. या त्याच्या मालिकेलादेखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. चिरागचे नुकतेच 1 डिसेंबर 2016ला लग्न झाले आहे. त्यामुळे हा व्हेलेंटाईन डे हा लग्नानंतरचा पहिला व्हेलेंटाईन डे आहे. त्याने हा दिवस त्याची पत्नी सनासोबत खूपच चांगल्याप्रकारे साजरा केला. चिराग हा क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा आहे तर चिरागची पत्नी सना ही क्रिकेटर सलील अंकोलाची मुलगी आहे. चिराग आणि सनाचे लव्ह मॅरेज असून त्यांनी अनेक वर्षांच्या नात्यानंतर लग्न केले आहे. चिराग आणि सनाची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. चिरागने सनाला खूपच स्पेशल स्टाइलमध्ये प्रपोज केले होते. त्याने तिच्यासाठी एक गाणे लिहिले होते आणि ते गायलेदेखील होते. याबद्दल चिराग सांगतो, "माझी आणि सनाची लव्हस्टोरी खूपच मस्त आहे. आमच्या दोघांच्या कुटुंबात खूप चांगली मैत्री असल्याने सना आणि मी अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आम्ही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहोत. आमच्या मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर झाले हे कळलेच नाही. मला सना आवडायला लागली आहे याची जाणीव झाल्यानंतर मी तिला प्रपोज करायचे ठरवले आणि त्यासाठी मी स्वतः एक गाणे लिहिले आणि ते गायलो. हे गाणे ऐकताच सनाने मला होकार दिला. सनाला मी प्रपोज करून आता सहा वर्षं झाली आहेत. मी एक अभिनेता असलो तरी सनासाठी गीतकार आणि गायक दोन्हीही बनलो होतो."