Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुबोध झाला नाॅस्टॅलजिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 15:19 IST

                प्रत्येक कलाकाराला त्याची पहिली भूमिका प्रिय असते. आपल्या कामाचे जर प्रेक्षकांनी कौतुक केले तर त्यासारखा दुसरा आनंद ...

                प्रत्येक कलाकाराला त्याची पहिली भूमिका प्रिय असते. आपल्या कामाचे जर प्रेक्षकांनी कौतुक केले तर त्यासारखा दुसरा आनंद कलाकारांसाठी काहीच नसतो. कलाकारांना मिळालेला पहिला ब्रेक, पहिली संधी आणि कॅमे-यासमोरील त्यांचा पहिला क्षण या सर्वच गोष्टी कायम स्मरणात राहणा-या असतात. एखाद्या चित्रपटामुळे किंवा मालिकेमुळे जर कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आला तर त्यातील भूमिका  त्याच्या आठवणींमध्ये कायम बंदिस्त होऊन जाते. आता हेच पाहा ना, सुबोध भावेने नूकताच एक फोटो सोशलसाईट्सवर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये तो फारच वेगळा दिसत आहे. हा माझा फेव्हरेट लुक असल्याचेही तो सांगतोय. पण हा त्याचा हा लुक कोणत्या चित्रपटातील नाही तर एका मालिकेमधील आहे. सीएनएक्सशी बोलताना सुबोध सांगतो, हा फोटो माझी पहिली प्रमुख भूमिका असलेली मालिका 'कुलवधु' मधील आहे.  हा फोटो माझ्यासाठी नेहमीच खास असेन. कारण या मालिकेवर लोकांनी प्रचंड प्रेम केलेय. मी या मालिकेतील माझी भूमिका कधीच विसरू शकत नाही. आणि म्हणूनच सुबोधने त्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.