Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूषण प्रधान आणि पल्लवी पाटीलची लव्हस्टोरी, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 14:58 IST

सध्या सर्वत्र चर्चा रंगलीय ती अभिनेता भूषण प्रधान आणि पल्लवी पाटीलच्या लव्हस्टोरीची

प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी प्रेमात पडतोच. कधी हे प्रेम व्यक्त होतं, तर कधी आयुष्यभर अव्यक्तचं राहतं, पण काहीही असलं तरी प्रत्येकाची एक लव्हस्टोरी असतेच..! सध्या सर्वत्र चर्चा रंगलीय ती अभिनेता भूषण प्रधान आणि पल्लवी पाटीलच्या लव्हस्टोरीची. 

‘सांग सजणी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु’ असं म्हणत भूषण सध्या पल्लवीच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसतोय. भूषण आणि पल्लवीची फुलणारी ही लव्हस्टोरी खऱ्या आयुष्यातील नसून व्हिडिओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या आपली Love Story  या अल्बमच्या एका गाण्यासाठी आहे.

व्हिडिओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या आपली Love Story  या गाण्यात भूषण आणि पल्लवीचा रोमँटिक अंदाज पहायला मिळतोय. नुकतचं हे गाणं लाँच करण्यात आलं. या गीताचे वादकांसोबत लाइव्ह रेकॉर्डिंग झाले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे भूषण आणि पल्लवी यांवर शूट झालेलं हे गाणं याचे गायक कलाकार ऋषीकेश रानडे व कीर्ती किल्लेदार यांच्यावर ही चित्रीत करण्यात आले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असावा. पुढच्या आठवड्यात ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

‘प्रत्येकाला पुन्हा एकदा प्रेमात पडावसं वाटेल असं हे गाणं करताना खूप मजा आली’, असं सांगताना भूषण, पल्लवी आणि नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकर यांनी चांगल्या गाण्यासाठी व्हिडिओ पॅलेसच्या नानूभाई यांचे आभार मानले. कलाकारांसोबत गायकांनासुद्धा प्रमोट करणार हे गाणं करायला मिळाल्याचा आनंद ऋषीकेश रानडे व कीर्ती किल्लेदार यांनी व्यक्त केला.

सचिन आंबट यांनी लिहिलेलं हे रोमँटिक अंदाजातील गाणं ऋषीकेश रानडे, कीर्ती किल्लेदार यांनी गायलं आहे. रोहित ननावरे आणि विकी अडसुळे यांचे सुमधुर संगीत या गाण्याला लाभले आहे. या गाण्याचे छायांकन अमोल गोळे तर संकलन गुरु पाटील, महेश किल्लेकर यांचे आहे. 

टॅग्स :भुषण प्रधानपल्लवी पाटील