‘लॉस्ट अॅण्ड फाऊंड’ २९ ला होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 14:29 IST
‘लॉस्ट अॅँड फाऊंड’ या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाल्याने पे्रक्षकांच्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर आणि ...
‘लॉस्ट अॅण्ड फाऊंड’ २९ ला होणार प्रदर्शित
‘लॉस्ट अॅँड फाऊंड’ या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाल्याने पे्रक्षकांच्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांची प्रमुख भूमिका असून हा चित्रपट २९ जूलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिध्दार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांच्यासह डॉ. मोहन आगाशे आणि मंगेश देसाईंचा देखील अभिनय पाहायला मिळणार आहे.‘लॉस्ट अँड फाऊंड’ या चित्रपटाची टॅगलाईन ‘खरंच कुणीतरी हवं असतं ना बोलायला’ ही आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन धुरा ऋतुराज धालगडे यांनी केले आहे.