Join us

हे पाहा... प्रिया मराठे कोणाच्या प्रेमात पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 10:47 IST

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री प्रिया मराठे एका पूजाच्या प्रेमात पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. आता ही पूजा ...

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री प्रिया मराठे एका पूजाच्या प्रेमात पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. आता ही पूजा कोण या विचारात तुम्ही नक्कीच पडला असाल? घाबरू नका, ही पूजा म्हणजेच प्रियाची दुसरी, तिसरी कोणी नसून तिची लाडकी घोडी असल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. कारण तिने नुकतेच एका घोडीसोबतचे झक्कास फोटो सोशलमीडियावर अपलोड केले आहेत.      तसेच तिने एक पोस्टदेखील शेअर केली आहे. ती आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगते, पूजाशी माझे खूप भावनिक नाते आहे. ती खूप उंच आणि ताकदवान आहेत. तितकीच गोडदेखील असल्याचे तिने सांगितले. प्रिया आणि पूजाच्या या प्रेमाला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहेत. तसेच प्रिया लय भारी, कडक अशा अनेक कमेंन्ट मिळताना सोशलमीडियावर पाहायला मिळत आहेत.         प्रियाने यापूर्वी अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तसेच तू तिथे मी या मालिकेतून ती खलनायिकेच्या भूमिकेतदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या सुखानो या, चार दिवस सासूचे अशा अनेक मालिकेतून तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तसेच तिची पवित्र रिश्ता या लोकप्रिय हिंदी मालिकेतील भूमिकादेखील लाजवाब होती. या मालिकेतील वर्षाच्या भूमिकेने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याचबरोबर बडे अच्छे लगते हो, कसम से, भाग रे मन अशा अनेक हिंदी मालिकादेखील तिने केल्या आहेत. यानंतर प्रिया अनेक मराठी चित्रपटांच्या माध्यमातूनदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आता ती, दिग्दर्शक गोविंदा निहलानी यांच्या चित्रपटात झळकणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात सुबोध भावे, भूषण प्रधान, सोनाली कुलकर्णीदेखील असणार आहेत.