Join us

हे पाहा, स्वानंदी टिकेकरचे बिझी शेडयुल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 15:59 IST

 प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप बिझी असते. मात्र कधी या बिझी शेडयुल्डमुळे व्यक्तीचा संताप वाढतो. ती चिडचिड करू लागते. ...

 प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप बिझी असते. मात्र कधी या बिझी शेडयुल्डमुळे व्यक्तीचा संताप वाढतो. ती चिडचिड करू लागते. तिला आपले रोजचे शेडयुल्ड नकोसे वाटते. कुठे अडकलो येऊन अशीच प्रत्येक व्यक्तीची भावना असते. मात्र प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर याला अपवाद ठरली आहे. तिला आपले बिझी शेडयुल्ड फारच आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सध्या तिच्या दोन गोष्टींची खूपच चर्चा रंगत असल्याचे दिसत आहे. एकीकडे तिची दिल दोस्ती दुबारा ही मालिका तर दुसरीकडे एक शून्य तीन हे नाटक अधिकच लोकप्रिय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणूनच एकीकडे मालिकेचे चित्रिकरण तर दुसरीकडे नाटकाचे प्रयोग यामुळे तिचे संपूर्ण शेडयुल्डच खूपच बिझी असल्याचे दिसत आहे. मात्र तिच्या या शेडयुल्डला स्वानंदी ही कंटाळलेली दिसत नाही. कारण तिने नुकतेच सोशलमीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. त्याचबरोबर शुट, प्रयोग, शुट, प्रयोग असे शेडयुल्ड असले तरी, आय लव्ह इट लाइफ अशी पोस्टदेखील तिने केली आहे. त्यामुळे कलाकार हे किती सकारात्मक दृष्टया विचार करत असतात याचे एक छान उदाहरण म्हणजे स्वानंदी टिकेकर आहे असे म्हणण्याल हरकत नाही. स्वानंदीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. ती दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या मालिकेतील तिची मीनलची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. तसेच ती सध्या अभिनेता सुमीत राघवन यांच्यासोबत एक शून्य तीन या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर आपल्या अभिनयाची चुणूक दाखविताना दिसत आहे.