सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट आले आणि काही चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहेत. समाजापर्यंत संदेश पोहचवण्यासाठी चित्रपट हे एक उपयोगी माध्यम आहे. चित्रपटातून दाखवलेली समस्या आणि त्या समस्यांवरची तोडगा प्रेक्षकांपर्यंत सहजरित्या पोहचू शकतो. असाच एक नवीन चित्रपट येत आहे ज्याचे नाव आहे ‘कस्पाट’.
‘कस्पाट’ या चित्रपटातून सर्व सामान्य शेतक-यांच्या सर्वसामान्य प्रश्नांवर उजाळा टाकण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश नितीनचंद्र यांनी केले आहे. शेतक-यांच्या समस्या सर्वांनाच ठाऊक असतील असं नाही. पण या चित्रपटातून शेतक-यांची परिस्थिती प्रेक्षकांना अनुभवता येईल.
चित्राई फिल्म प्रॉडक्शन आणि एवीके फिल्म्स प्रस्तुत ‘कस्पाट’ या चित्रपटाची निर्मिती शुभम शशिकांत मोरे आणि एँथनी विनसेंट कोलगे यांनी केली आहे. या चित्रपटात श्रेयस भागवत, त्रिवेनी भोर, सुदाम पवार, सुनील गोडबोले यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.