मराठीत लिव्ह इन रिलेशनशिप : उफ्फ मेरी अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 12:29 IST
मराठी सिनेमांप्रमाणेच विविध कथा संकल्पनेवर आधारीत वेबसिरिजही निर्मिती होत आहे.नवा आशय आणि नवी स्टारकास्टसह एक नवीन वेबसिरिज रसिकांच्या भेटीला ...
मराठीत लिव्ह इन रिलेशनशिप : उफ्फ मेरी अदा
मराठी सिनेमांप्रमाणेच विविध कथा संकल्पनेवर आधारीत वेबसिरिजही निर्मिती होत आहे.नवा आशय आणि नवी स्टारकास्टसह एक नवीन वेबसिरिज रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे.प्रेमात पडल्यावर पुढचा टप्पा येतो तो लग्नाचा.पण किती प्रेमी युगल प्रेमात एकत्र जगण्या - मरण्याच्या आणाभाका घेतल्यानंतर लग्नाच्या बंधनात अडकतात.त्यामुळेच अलीकडच्या काळात एकमेकांना अधिक जवळून समजून घेण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिप हा ट्रेंड वाढत जातंय.लग्न न करता स्वतःहून ठरवून दोघांनी एकत्र राहणे म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप.याचा जसा फायदा आहे तसा तोटा देखील आहे.अजूनही ही संकल्पना मराठी संस्कृतीत तेवढी रुजली नाहीये.अशाच प्रेमात पडलेल्या प्रेमी युगलांची फ्रेश लव्ह स्टोरी असलेली “उफ्फ मेरी अदा”नावाची मराठी वेब सिरीज युट्यूब चॅनलवर सुरु झाली आहे.प्रेमाच्या सुरुवातीच्या भेटीत म्हणा किंवा प्रेमात असताना नेहमी आपण चांगले वागत असतो,आपल्या वाईट सवयी लपवत सदैव चांगुलपणाचा आव आणत असतो.मात्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना कळत नकळत आपल्यातील गुण,अवगुण,स्वभाव आपल्या सवयी आपल्या जोडीदाराला कळू लागतात.अगदी सकाळच्या ब्रश करण्याच्या पद्धतीपासून ते रात्री बेडवर झोपण्याच्या स्टाईलपर्यंत सगळ्याच गोष्टी हळुहळु समजायला लागतात.कधी कधी त्या खूप विचित्र सवयी ही असतात आणि मग त्यावरून होणारी भांडणं,रुसवे-फुगवे अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतून खूप मज्जाही करणा-या गोष्टी पाहायला मिळतात.शिवाय एकमेकांना जास्त समजून घेतलं जाऊ शकतं.आज काल लिव्ह इनमध्ये राहणार का? याला अर्थात आपल्याकडे इतका सहज होकार मिळत नाही.पण जेव्हा अशी कुणी राहायला सुरुवात केली तर नक्की काय काय घडू शकतं? किती मजा आणि किती रुसवे-फुगवे होऊ शकतात.अशाच आशयावर आधारित ही वेबसिरीज आहे ‘उफ्फ मेरी अदा’ ही वेब सिरीजच पाहण्यासाठी युथ क्राऊ़डमध्ये खूप उत्सुकता पाहायला मिळत आहे.यशोधन टक,भूमी दळी,राजू जगताप,प्रथमेश पुराणिक, अभिक, ऋशिकेश पाटीलसह अनेक कलाकारांच्या यांत प्रमुख भूमिका आहेत.मराठीत इतर वेबसिरीजप्रमाणे ही वेबसरिजही हिट ठरेन अशी आशा या सिरीजच्या टीमने व्यक्त केली आहे.