सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांच्या घरी नुकतेच चिमुकल्यांचे आगमन झाले आहे. काही दिवसांपूर्वी खुशबू तावडे आणि संग्राम साळवी यांनी ते आई-बाबा झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने तिला पुत्ररत्न प्राप्त झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले. ही अभिनेत्री म्हणजे विठू माऊली मालिकेत जानकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंकिता भगत.
अंकिता भगतने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिले की, २५ नोव्हेंबरला मुलगा झाला हो...अंकिता भगतने हातावर मेहंदी काढून हा आनंदाचा क्षण साजरा केला आहे.
अभिनेत्रीसोबतच आहे उत्कृष्ट डान्सरअभिनेत्री अंकिता भगतने विठू माऊली मालिकेशिवाय बऱ्याच म्युझिक अल्बममधून झळकली आहे. ती अभिनयासोबतच उत्तम डान्सर आहे. जीव फसला ह्यो जाल्यामंदी, आई तुझा डोंगर यासारख्या अनेक व्हिडीओ सॉंग्सच्या माध्यमातून अंकिता प्रेक्षकांसमोर आली होती. झी युवा वरील युवा डांसिंग क्वीन या रिएलिटी शोमध्ये टॉप ६ फिनालिस्टमध्ये देखील ती पोहोचली होती. सोशल मीडियावर विनायक माळीच्या शेठ माणूस, माझी बायको या सीरिजमध्ये ती झळकली होती. या सिरीजमध्ये विनायक माळी आणि अंकिताची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना देखील खूपच आवडली होती.