Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘पिपाणी’ची छोटीशी झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 13:41 IST

नेहा राजपाल प्रॉडक्शन्स निर्मित आणि विजय मौर्या दिग्दर्शित ‘फोटोकॉपी’ या चित्रपटाविषयी अधिकची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. सुरुवातीला या चित्रपटाच्या पोस्टर विषयी सर्वत्र चर्चा होती. त्यानंतर चित्रपटाची तारीख प्रदर्शित करण्यात आली आणि आता या चित्रपटातील एका गाण्याचा टिझर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला.

नेहा राजपाल प्रॉडक्शन्स निर्मित आणि विजय मौर्या दिग्दर्शित ‘फोटोकॉपी’ या चित्रपटाविषयी अधिकची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. सुरुवातीला या चित्रपटाच्या पोस्टर विषयी सर्वत्र चर्चा होती. त्यानंतर चित्रपटाची तारीख प्रदर्शित करण्यात आली आणि आता या चित्रपटातील एका गाण्याचा टिझर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला.  प्रेक्षकांना फोटोकॉपी कधी हातात मिळतेय असं नक्कीच वाटत असणार. पण असो! चांगल्या गोष्टीची उत्सुकता वाढणे हे नक्कीच चांगलं असतं. कारण काहीतरी इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे याची खात्री पटते.

 ‘फोटोकॉपी’ या चित्रपटातील पिपाणी या गाण्याचा टिझर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आणि या टिझरला प्रेक्षकांकडून लगेच लाईक्स मिळाले. जेव्हा पूर्ण गाणं प्रदर्शित होईल तेव्हा प्रेक्षकांना नक्कीच जास्त आनंद होईल. “तुझ्या माझ्या प्रितीची पिपाणी वाजू दे...” हे गाण्याचे बोल फारच इंटरेस्टिंग आहेत आणि सर्वांच्या पसंतीस उतरेल, या गाण्याच्या संगीतावर आपल्याला थिरकायला भाग पाडेल असं हे गाणं आहे. 

तुम्ही पण पाहा या गाण्याची छोटीशी झलक-

             

‘फोटोकॉपी’ या चित्रपटाच्या नावावरुनच चित्रपटातील वेगळेपण कळून येतं. पर्ण पेठे, चेतन चिटणीस, पर्ण पेठे अशी तीन कलाकारांची नावं पोस्टरवर दाखविण्यात आली आहे. पर्ण पेठे ची फोटोकॉपी ही पर्ण आहे. कळलं का आता तुम्हांला? या चित्रपटात दोन जुळ्या बहिणींची कथा मांडण्यात आली आहे. याविषयी सर्व माहिती आपल्याला १६ सप्टेंबर रोजी कळेल.