Join us

ओळखा पाहू आईने पकडलेल्या या चिमुकलीला? आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'वजनदार' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 13:54 IST

मराठमोळ्या या अभिनेत्रीच्या बालपणीच्या फोटोवर चाहतेच नाही तर सेलिब्रेटीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत.

सध्या सोशल मीडियावर बालपणीच्या फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळतो. या ट्रेंडमध्ये सेलिब्रेटी मंडळीदेखील सामील झाले आहेत. बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री, सेलिब्रेटींनी देखील त्यांच्या बालपणींचे फोटो शेअर करताना दिसतात आणि आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. दरम्यान मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हिने देखील तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करण्यामागेदेखील खास कारण आहे. ते कारण म्हणजे तिच्या आईचा वाढदिवस असून या निमित्ताने तिने ही खास पोस्ट शेअर केली आहे.

प्रिया बापट हिने इंस्टाग्रामवर आई सोबतचा बालपणीचा फोटो शेअर करत लिहिले की, माझी आई. सर्वात प्रेमळ, लाघवी, सहनशील, मनमोकळी, शांत, अंतर्मुख, माणसं जपणारी, कधीही न चिडणारी माझी आई. आज तुझा वाढदिवस. मी तुला काय शुभेच्छा देणार… तू समाधानी आहेस मला माहीत आहे. अशीच आनंदी राहा. तुझे आशिर्वाद आहेतच कायम. या फोटोत आईने पकडलेली चिमुकली प्रिया बापट खूपच क्युट दिसते आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. इतकेच नाही तर तिच्या या पोस्टवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटीदेखील कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

प्रिया बापट हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिने बऱ्याच मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने हिंदी वेबसीरिजमध्येदेखील काम केले आहे. नुकतेच प्रियाने विस्फोट या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :प्रिया बापट