Join us

आमच्यासोबत जाणून घ्या कुठे फिरतेय उर्मिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 14:01 IST

पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून काश्मीरला ओळखले जाते. पण काश्मीर इतकेच सौंदर्य हिमालय प्रदेशातदेखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे काश्मीर, हिमाचल प्रदेश ...

पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून काश्मीरला ओळखले जाते. पण काश्मीर इतकेच सौंदर्य हिमालय प्रदेशातदेखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे काश्मीर, हिमाचल प्रदेश यांना एकदातरी भेट देण्याची प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून पर्यटकही पहिली पसंती काश्मीर, कुलू मनाली, शिमला या ठिकाणांनाच देतात. अशा या बर्फाळ प्रदेशाचा आनंद लुटण्यासाठी कलाकार तरी कसे मागे राहतील. अभिनेत्री उर्मिला कोठारेदेखील सध्या शिमला येथे आहे. नुकताच तिने शिमलात निसर्गाच्या सानिध्यात काढलेले सुंदर फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. शिमलाच्या या जंगलात शुद्ध ऑक्सिजन असल्याचेदेखील उर्मिला सांगते. सध्या उर्मिला शुद्ध हवेचा आनंद घेते आहे. तिचे चाहते मात्र उर्मिलाला शिमलाच्या जंगालात पाहून आवाक झाले आहेत हे मात्र नक्की. ती शिमलाला सध्या नवीन प्रोजेक्टसाठी गेली असल्याचे तिने स्टेटसमध्ये लिहिले आहे. हा स्टेटस वाचल्यावर तर तिच्या फॅन्सना आता ती कोणत्या चित्रपटात झळकणार याची उत्सुकता लागली आहे.