Join us
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे प्रेमात? हा आहे तिचा मि. परफेक्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 11:06 IST

सध्या स्वानंदीची एक पोस्ट चर्चेत आहे. होय, फोटोच्या कॅप्शनने चाहत्यांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत.

ठळक मुद्देआई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वानंदी सुद्धा अभिनयाच्या दुनियेत येण्यासाठी सज्ज आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते. ब-याचदा ती फोटोंमुळे चर्चेत येत असते. सध्या स्वानंदीची एक पोस्ट चर्चेत आहे. होय, ही पोस्ट पाहिल्यानंतर स्वानंदीला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला, असे मानले जात आहे. फोटोच्या कॅप्शनने चाहत्यांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत.

स्वानंदीने एका मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. प्रेम मोदी असे या फोटोतील तरूणाचे नाव आहे. तरूणासोबत स्वानंदीने अतिशय स्टाईलिश पोज दिल्या आहेत. कॅप्शन तर असे की, सध्या त्याचीच चर्चा आहे.‘ तुझ्य चेह-यावरचे हास्य पाहण्यासाठी मी काहीही करु शकते. आयुष्यातील कठीण काळात आपण अधिक जवळ आलो आहोत. आता तुझी इतकी सवय झाली आहे की इकटीला भिती वाटते आहे. खुप प्रेम...,’ असे या पोस्टसोबत स्वानंदीने लिहिले आहे. 

तिच्या या पोस्टला प्रेम मोदीनेही साजेसे उत्तर दिले आहे. त्यानेही स्वानंदीसोबतचा सेम फोटो शेअर करत, आपले प्रेम व्यक्त केले आहे. हा फोटो आपल्या मैत्रीचे दर्शक आहे. आयुष्याच्या कठीण काळात तू माझा हात धरलास, माझ्या विनोदांवर खळखळून हसलीस. ही वेडी मुलगी माझ्या आयुष्याची ताकद आहे. तुला वाटते, त्यापेक्षा अधिक मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्या द्विअर्थी विनोदांवर हसण्यासाठी आणि माझ्यावर अस्सीम प्रेम करण्यासाठी तुझे आभार..., असे त्याने लिहिले आहे.

आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वानंदी सुद्धा अभिनयाच्या दुनियेत येण्यासाठी सज्ज आहे. ‘रिस्पेक्ट’ या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. 

टॅग्स :स्वानंदी बेर्डेलक्ष्मीकांत बेर्डे