Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानच्या सिनेमातील अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते लक्ष्मीकांत बेर्डे, घटस्फोट न घेताच झाले वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 16:11 IST

मराठीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना हिंदी चित्रपटातही लक्ष्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानच्या मित्राची भूमिका त्याने छान निभावली.

रसिकांना त्याने खळखळून हसवलं, रसिकांना सारं दुःख विसरायला लावलं आणि मनमुराद मनोरंजन केलं. मराठी असो किंवा हिंदी सिनेमा, त्याच्या कॉमेडीच्या भन्नाट आणि अचूक टायमिंगने रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं. केवळ कॉमेडीच नाही तर कोणत्याही भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे सा-यांचा लाडका लक्ष्या.

 

लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेने आपल्या अभिनयाने रसिकांना पोट धरुन हसायला लावलं, त्यांचं मनोरंजन केलं. मात्र या जगातून लक्ष्याची अचानक एक्झिट झाली आणि सा-या रसिकांच्या डोळ्यात पाणी आलं. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत लक्ष्याने रसिकांचं मनोरंजन केलं.  'हम आपके है कौन' सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, यांनी चित्रपटात साकारलेल्या आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. 

मराठीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना हिंदी चित्रपटातही लक्ष्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानच्या मित्राची भूमिका त्याने छान निभावली. 'मैने प्यार किया सिनेमात सलमान खानने पहिल्यांदाच लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर काम केले होते. सलमानने या सिनेमाच्या यशाचं सगळं श्रेय लक्ष्मीकांत बेर्डे यांनाच दिले होते. त्यानंतर 'साजन' सिनेमातही सलमानसोबत काम केले होते. याच सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे रुही नावाच्या कोस्टारच्या प्रेमात पडले होते. 

दोघांची याच दरम्यान जवळीक वाढली होती. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले शेवटी दोघांनीह लग्न करण्याचा निर्णय घेतला. तसे झालेही लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रुही यांच्याबरोबर लग्नही केले .मात्र काही कारणामुळे दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर लक्ष्मीकांत पुन्हा एकदा प्रेमात पडले. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती होची प्रिया अरुण. दोघेही बरेच दिवस लिव्ह इनमध्ये राहिले. त्यानतंर दोघांनी लग्न करत संसार थाटला. 

लक्ष्यानंतर त्याची पत्नी प्रिया बेर्डे चित्रपटसृष्टीत रसिकांचं मनोरंजन करत आहे.  लक्ष्याचा लेक अभिनय बेर्डे यानेही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. त्याच्यापाठोपाठ लेक स्वानंदी बेर्डेदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. 

टॅग्स :सलमान खानलक्ष्मीकांत बेर्डे