Join us

​ रंगणार लावणी गौरव पुरस्कार सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 19:51 IST

लावणी कलावंत महासंघ दरवर्षी आपला वर्धापन दिन ‘लावणी गौरव पुरस्कारा’ने साजरा करते. यंदा दुसºया वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या ...

लावणी कलावंत महासंघ दरवर्षी आपला वर्धापन दिन ‘लावणी गौरव पुरस्कारा’ने साजरा करते. यंदा दुसºया वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या २४ जूनला लावणी पुरस्कार सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात शहाजी काळे, अनंत पांचाळ, मेघराज भोसले, सुहासिनी नाईक, माणिक मयेकर, शाहीर रूपचंद चव्हाण, जयंत भालेकर या गुणी कलाकारांना गौरविण्यात येणार आहे. चित्रपट व नाट्यक्षेत्रासह या कलाकारांनी लोककलेच्या क्षेत्रातही भरीच कामगिरी केली आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिपाली सय्यद, मेघा घाडगे, सारा श्रवण, नम्रता गायकवाड, माया जाधव, वंदना राणे, प्राची चेऊलकर, हेमलता बाणे, आशिष पाटील, प्रभाकर मोरे, सुजाता पवार या सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.