अभिप्रिया प्रॉडक्शन्सचे आणि सुयोग निर्मित ‘प्लेझंट सरप्राइज’ या नव्या नाटकाचा आज १४ मे रोजी दुपारी ४:३० वाजता शुभारंभाचा प्रयोग ठाणे येथे गडकरी रंगायतन येथे झाला .
संदेश सुधीर भट आणि अभिजीत भोसले निर्मित ‘प्लेझंट सरप्राइज’ या नाटकाचे लिखाण आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. या नाटकात मयुरी देशमुख, प्राजक्ता माळी, समीर खांडेकर आणि सौरभ गोखले या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. नाटकाचे नेपथ्य प्रदिप मुळ्ये, संगीत रचना समीर सप्तीसकर, प्रकाश रचना भुषण देसाई यांनी याची जबाबदारी सांभाळली आहे.
आजपासून महाराष्ट्राला नाटक क्षेत्राकडून ‘प्लेझंट सरप्राइज’ मिळेल.