Join us

"बीएसएफ जवानांसोबत..." अभिनेत्यानं सांगितला काश्मीरमधील शूटिंगचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 17:32 IST

अभिनेत्यानं काश्मीरमधील शूटिंगच्या अनुभवाबद्दल सविस्तर सांगितलं.

ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. ललित प्रभाकरने रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. अलिकडेच त्याने 'ग्राउंड झिरो' या चित्रपटातून हिंदी सिनेमात डेब्यू केलाय. सत्य घटनेवर आधारित या सिनेमात ललित हा बीएसएफ जवानाच्या भुमिकेत झळकला आहे. या सिनेमाच्या शुटिंगसाठी ललित प्रभाकरनं काश्मीरमध्ये दिवस घालवले होते. नुकतंच अभिनेत्यानं काश्मीरमधील शूटिंगच्या अनुभवाबद्दल सविस्तर सांगितलं.

ललित प्रभाकर याने नुकतंच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी "खूपच कमाल होता, शब्दात सांगता येणार नाही" अशा शब्दांत अभिनेत्यानं काश्मीरमधील शूटिंगचा अनुभव शेअर केला आहे. तो म्हणाला, "काश्मीरची ओढ होतीच, पण फारसं फिरायचा योग आला नव्हता. मात्र यावेळी बीएसएफ जवानांसोबत पूर्णवेळ घालवणं हा अनुभव माझ्या हृदयाजवळचा ठरला. ज्याची मला लहानपणापासून खूप ओढ होती. मला बीएसएफची खूप आवड होती. अभियनाकडे लक्ष दिल्यानं तिकडे थोडं दुर्लक्ष झालं. पण, जवानांबरोबर बरोबर राहणं, त्यांचं आयुष्य एवढ्या जवळून पाहणं. विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर, त्यांच्या नजरेतून काश्मीर बघणं, याचा एक वेगळा अनुभव होता".

त्यानं पुढे सांगितलं की,"ज्या पद्धतीचं काम आम्ही करत होतो. जे आमचं पात्र होतं, त्यामुळे काश्मीरमध्ये फिरताना आम्हीदेखील बीएसएफच्या कपड्यांमध्ये असायचो, त्यामुळे तेथील लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्यांच्याकडून मिळणारा आदर ते दिसयाचं. बीएसएफमुळं एक वेगळं काश्मीर पाहता आलं. तेथील लोकही सपोर्टीव्ह होती. आम्ही स्टुडिओमध्ये नाही, तर प्रत्यक्ष काश्मीरमध्ये, लोकांच्या आसपास राहून शूटिंग केलं. स्थानिक लोकांनी खूप सहकार्य केलं".

चित्रपट ओटीटीवर कुठे पाहता येणार?

मीडिया रिपोर्टनुसार, 'ग्राउंड झिरो' चित्रपटाचे ओटीटी राइट्स प्राइम व्हिडीओने खरेदी केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार,  २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट रिलीजच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र अद्याप 'ग्राउंड झिरो' ओटीटी रिलीजची अधिकृत तारीख समोर आली नाही आहे. 'ग्राउंड झिरो'मध्ये इमरान हाश्मीसोबत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील झळकली आहे. इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' हा चित्रपट बीएसएफ अधिकारी नरेंद्र नाथ दुबे यांच्यावर आधारित आहे. 

टॅग्स :ललित प्रभाकर