‘लाल इश्क’ चला हवा येऊ द्याच्या सेटवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 14:37 IST
सोमवार-मंगळवार आला म्हणजे थुकरटवाडीतील मनोरंजनाचे वारे वाहायला लागणार. आजच्या एपिसोडमध्ये नक्की कोण येणार याची उत्सुकता सर्वांनाच असते. म्हणून तर ...
‘लाल इश्क’ चला हवा येऊ द्याच्या सेटवर...
सोमवार-मंगळवार आला म्हणजे थुकरटवाडीतील मनोरंजनाचे वारे वाहायला लागणार. आजच्या एपिसोडमध्ये नक्की कोण येणार याची उत्सुकता सर्वांनाच असते. म्हणून तर आम्ही तुम्हांला त्याची माहिती देतो.आज थुकरवाडीमध्ये रंगणार लाल इश्कची आणि लालबागची राणीची धमाल-मस्ती. संजय लीला भन्साळी निर्मित पहिला वहिला मराठी चित्रपट ह्यलाल इश्क- गुपीत आहे साक्षीलाह्ण आणि लालबागची राणी या चित्रपटातील कलाकार आज चला हवा येऊ द्याच्या मंचावर येणार आहेत. स्वप्नील जोशी, अंजना सुखानी, वीणा जामकर, प्रथमेश परब आदी कलाकार या रंगमंचावर एकत्र येणार म्हणजे धमाल तर होणारच. चला मग तयार राहूयात आज रात्री ९:३० वाजता ह्यचला हवा येऊ द्याह्णचा मजेशीर एपिसोड पाहायला फक्त झी मराठी वाहिनीवर.