Join us

"लेथ जोशी" चित्रपटाचं प्रमोशनल साँग सोशल मीडियावर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 09:55 IST

१३ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या "लेथ जोशी" या चित्रपटाचं वैशिष्ट्यपूर्ण प्रमोशनल साँग सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. 

ठळक मुद्दे माणसाचं जगणं आणि मशीन यांच्यातलं नातं हे गीत नेमकेपणानं अधोरेखित करतं

चित्रपटाची ओळख कशाही पद्धतीनं होऊ शकते. चित्रपटाची ओळख गाण्यांनी होते, कथानकानं होते, मांडणीनं होते, अभिनयानं होते, छायांकनाने होते... १३ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या "लेथ जोशी" या चित्रपटाचं वैशिष्ट्यपूर्ण प्रमोशनल साँग सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. 

अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांच्या अमोल कागणे स्टुडिओजने हा चित्रपट प्रस्तुत केला असून, प्रवाह निर्मिती आणि डॉन स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मंगेश जोशी यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, सेवा चौहान,  ओम भूतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सत्यजित शोभा श्रीराम यांनी सिनेमॅटोग्राफी तर मकरंद डंभारे यांनी संकलन म्हणून काम पाहिले आहे.कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करणारे ज्येष्ठ कामगार नेते  अजित अभ्यंकर भांडवलदाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

"एक मशीन बाहेर आणि एक मशीन आत, आत आणि बाहेर नुसताच खडखटाट...."अशा ओळी असलेलं गाणं खूपच स्पेशल आहे. माणसाचं जगणं आणि मशीन यांच्यातलं नातं हे गीत नेमकेपणानं अधोरेखित करतं. वैभव जोशी यांनी लिहिलेलं गीत नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. जयदीप वैद्य या नव्या दमाच्या गायकानं हे गीत गायलं आहे. साधेसोपे शब्द, उत्तम चित्रीकरण आणि गुणगुणावीशी वाटणारी चाल यामुळे हे गाणं नक्कीच चित्रपटप्रेमींच्या पसंतीला उतरेल यात काहीच शंका नाही. अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला "लेथ जोशी" हा चित्रपट १३ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.  

टॅग्स :मराठी