‘लाडाच्या गणपती मंदिरात’ देहांतचा मुहूर्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 14:37 IST
निर्माते सदानंद (पप्पू ) लाड यांच्या एल जी प्रॉडक्शन निर्मित आणि अंकुर मुव्हीज प्रस्तुत देहांत या सामाजिक चित्रपटाचा मुहूर्त ...
‘लाडाच्या गणपती मंदिरात’ देहांतचा मुहूर्त!
निर्माते सदानंद (पप्पू ) लाड यांच्या एल जी प्रॉडक्शन निर्मित आणि अंकुर मुव्हीज प्रस्तुत देहांत या सामाजिक चित्रपटाचा मुहूर्त गिरगावातील प्रसिद्ध लाडाचा गणपती मंदिरात भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यानंतर चित्रपटाचे चित्रीकरण गिरगावातील विविध ठिकाणी सुरु झाले आहे. प्रदीप म्हापुस्कर लिखित आणि भगवानदास दिग्दर्शित या चित्रपटातून बालमनावर होणाऱ्या दुष्परिणामांना वेगळी वाट करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या चित्रपटात अशोक शिंदे, दीप्ती भागवत, सुप्रिया विनोद, अंकुर लाड, सुहृद वाडेकर, रश्मी राजपूत इत्यादी कलाकार प्रमुख भूमिकेत असून डीओपी संतोष यांची आहे. चित्रपटाला मधुर संगीत लहू माधव यांचे आहे.आजची पिढी मोबाईल व्हाट्सअँपच्या अधीन चालली आहे. मुलांचा मैदानी खळांकडे कल उरला नाही. त्यांना पालक महागडे फोन घेऊन देतायत, पण मुले त्याचा नेमका कसा वापर करीत आहेत? मोबाईल इंटरनेटवर कोणत्या लिंक्स पाहतात? याकडे अजिबात लक्ष नाहीये. आजच्या मुलांपेक्षा पालकांना अधिक सजक करण्याची गरज वाटल्याने ह्या विषयाला हात घातला असल्याचे या चित्रपटाचे सहनिर्माते व कलाकार अंकुर लाड म्हणाले.देहांतचे लेखक प्रदीप म्हापसेकर म्हणाले, गेली २५ वर्षे वृत्तपत्र माध्यमात सजावट आणि चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. ते म्हणतात या माध्यमात काही गोष्टी चित्रांपलीकडच्या जाणवतात. त्यामांडण्यासाठी रुपेरी पडद्याचा कॅनव्हास सतत खुणावत होता. दिग्दर्शक भगवानदास आणि मी जेजेचे विद्यार्थी. आमच्या विचारात अंशतः समानता असून मला काय म्हणायचे आहे ते त्याला सहज कळते. हा विषय मला अस्वस्थ करीत होता. यावर चित्रपट करावा असा विचार जोर धरू लागला आणि भगवानदास सोबत सखोल चर्चा होऊ लागली. आम्ही ही गोष्ट फुलवायला घेतली आणि सदानंद (पप्पू) लाड, अंकुर लाड यांना ती आवडली सुद्धा. चित्रपटाच्या निर्मितीने वेग घेतला. चित्रपटाची मांडणी सरळ साधी सोप्पी असावी यादृष्टीने "देहांत"ची पटकथा रचली आहे. ही कथा आम्हा सगळ्यांनाच अस्वस्थ करीत असून तोच अनुभव चित्रपटगृहातील प्रत्येकाच्या वाट्याला येईल अशी खात्री वाटते आहे.