मिलिंद अरुण कवडे दिग्दर्शित '1234' हा सस्पेन्स-थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर आता या चित्रपटातलं गाणं ऐकण्याची आणि पाहण्याची वेळ आली आहे.
‘बोलना’ हे गाणं नुकतंच सोशल मिडीयावर प्रदर्शित झालं. '1234' या चित्रपटातलं पहिलंच गाणं आणि ते देखील रोमँटिक गाणं प्रेक्षकांना ऐकायला आणि बघायला मिळणार आहे.
‘बोलना’ हे रोमँटिक गाणं कुणाल गांजावाला आणि आनंदी जोशी यांनी गायलं आहे. या गाण्याचे बोल सचिन अंधारेनी लिहिले आहे तर अमितराजने हे गाणं संगीतबध्द केलं आहे. कुणाल गांजावालाच्या आवाजाची जादू या त्याच्या नवीन गाण्यातून प्रेक्षक वर्ग अनुभवू शकतात. आनंदी जोशीचा आवाज तर मनावर मोहिनी घालते आणि अमितराज यांच्या संगीताचे प्रत्येकजण फॅन आहेत. या तिघांची वैशिष्ट्यपूर्ण कार्याची जादू ‘बोलना’ गाण्यातून अनुभवूया-