Join us

आय लव यू माय प्राणवायू...! हेमंत ढोमेनं बायकोला दिल्या हटके शुभेच्छा, त्याच्या पत्नीला पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 17:37 IST

Kshiti Jog and Hemant Dhome Wedding Anniversary : होय, आज हेमंतच्या लग्नाचा नववा वाढदिवस. हेमंतने बायकोचा फोटो पोस्ट करत तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि क्षिती जोग (Kshiti Jog ) हे मराठीतील क्यूट कपल. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून 2010 साली प्रेक्षकांसमोर आलेला अभिनेता हेमंतने 2012 साली अभिनेत्री क्षिती जोगसोबत संसार थाटला आहे. आज या संसाराला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. होय, आज हेमंत आणि क्षिती त्यांच्या लग्नाचा नववा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. हेमंतने क्षितीचा फोटो पोस्ट करत तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. आय लव यू माय प्राणवायू..., असं लिहित त्याने एक झक्कास पोस्ट शेअर केली आहे.

‘तिच्या मनात वेगळं असतं आणि माझ्या मनात वेगळं... 9 वर्ष झाली तरी हाच गोंधळ... पण यासारखं अजुन जगात दुसरं काहीच नाही... आय लव यू माय प्राणवायू... पाटील लाडात, पाटलीनबाई प्रेमात, सरीवर सरी अ‍ॅनीवरसरी...,’ अशी पोस्ट हेमंतने शेअर केली आहे. सोबत दोघांचा एक सुंदर फोटोही आहे.क्षितीनेही हेमंतसोबतचा एक धम्माल फोटो शेअर केला... चल हसू, चल भांडू, चल वाद घालू, चल अपयश पाहू, चल यश पाहू... दोघांच्या चुका काढून, एकमेकांचे लाड करू... अशा अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. सुखी संसाराची 9 वर्षे, तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..., अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.

नाटकाच्या रिहर्सलच्या निमित्ताने क्षिती व हेमंत यांची पहिली भेट झाली होती. नाटकाच्या निमित्ताने झालेल्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि नंतर लग्नात. या लव्हस्टोरीत कोणीच कोणाला प्रपोज केले नाही. एकमेकांच्या मनातल्या भावना एकमेकांना कळल्या आणि ही प्रेमकथा आपोआप बहरत गेली. प्रेमाची जाणीव झाल्याने दोघांनी आपआपल्या घरी कल्पना दिली. पण ‘चट मंगनी, पट ब्याह’ या अटीवर दोघांच्याही कुटुंबीयांनी या नात्याला परवानगी दिली. मग काय, क्षिती व हेमंतचा लगेच साखरपुडा झाली आणि वर्षभराच्या आत लग्न झालं.

क्षितीने आजवर मराठी आणि हिंदी या दोन्ही माध्यमांमध्ये अभिनय केला आहे. प्रसिद्ध आभिनेते अनंत जोग आणि उज्वला जोग यांची ती लेक.  दामिनी,वादळवाट, तु तिथे मी, ये रिश्ता क्या केहलाता है, घर की लक्ष्मी बेटीयान या मालिकांमधूनही ती दिसली. फु बाई फु या कॉमेडी रियॅलिटी शोमधून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.हेमंत हा अभिनेता, लेखक व दिग्दर्शक आहे. त्याने दिग्दर्शित केलेला ‘झिम्मा’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला.

टॅग्स :सेलिब्रिटी