कृष्णा अभिषेकचे मराठीमध्ये पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:43 IST
मराठी चित्रपटांना मिळणारे यश पाहाता आजकाल हिंदी कलाकारांनाही मराठीत काम करण्याची इच्छा असते. आता हेच पाहा ना, कॉमेडी नाईट्स ...
कृष्णा अभिषेकचे मराठीमध्ये पदार्पण
मराठी चित्रपटांना मिळणारे यश पाहाता आजकाल हिंदी कलाकारांनाही मराठीत काम करण्याची इच्छा असते. आता हेच पाहा ना, कॉमेडी नाईट्स बचावो या शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता कृष्णा अभिषेक हादेखील लवकरच मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे.'भिंगरी' या चित्रपटाच्याव्दारे अभिषेक मराठीत पदार्पण करतो आहे. या चित्रपटात कृष्णा अभिषेक सोबत अभिनेत्री कांचन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरली ललवाणी यांनी केले आहे.या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. तसेच या चित्रपटाचे काही चित्रिकरण कुलू मनालीला होणार आहे.