Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ते एखाद्या मोठ्या कलाकाराबद्दल..." सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगबद्दल क्रांती रेडकरची प्रतिक्रिया, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:15 IST

सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आपलं मत मांडलं.

Kranti Redkar Supports Sachin Pilgaonkar : सचिन पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत यशस्वी कलाकार म्हणून ओळखले जातात. 'अशी ही बनवाबनवी', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'गंमत जंमत', 'माझा पती करोडपती', 'आयत्या घरात घरोबा', 'नवरा माझा नवसाचा' असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी निर्माण केले आहेत. इतकं मोठं कर्तृत्व असूनही सचिन पिळगावकर गेल्या काही वर्षात बरंच ट्रोल होत आहेत. आपल्या कारकिर्दीबद्दल किंवा काही जुन्या आठवणींबद्दल केलेल्या वक्तव्यांवरुन नेटकरी सचिन पिळगावकर यांना लक्ष्य करत असतात. अशातच या ट्रोलिंगवर अभिनेत्री क्रांती रेडकर हिने संताप व्यक्त केलाय. 

लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत क्रांतीने सचिन यांचं कौतुक करत ट्रोलर्संना सुनावलं. ती म्हणाली, "सचिन यांच्या बाबतीत ट्रोलर्सनी मर्यादाच ओलांडली आहे. त्याचं खरंच वाईट वाटतं. त्या माणसाचं केवढं काम आहे. आम्हाला हातात धड चमचा धरता येत नव्हता, तेव्हापासून ते काम करत आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिलेले आहेत. ट्रोलर्स आपली ओळख लपवतात, चेहरा दिसत नाही म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल काहीही बोलणार? बरं, या ट्रोलर्सना तरी त्यामागची सत्यता माहीत आहे का?".

पुढे ती म्हणाली, "सचिन पिळगावकर एखादी गोष्ट सांगत आहेत, तर ते खरं आहे की खोटं, हे ठरवणारे तुम्ही कोण? ते म्हणत असतील तर त्यात काहीतरी तथ्य नक्कीच असेल. समजा ते एखाद्या मोठ्या कलाकाराबद्दल तसं काही बोललेच नसतील, तर मग तो मोठा कलाकार येऊन असं काही झालंच नव्हतं हे म्हणणार नाही का? त्यांनी काहीतरी म्हटलंय म्हणजे नक्कीच काहीतरी असेलच ना? निदान त्यांचं ऐकातरी". पुढे ट्रोलर्सच्या वागण्यावर संताप व्यक्त करताना क्रांती म्हणाली, "तुम्हाला जर काही म्हणायचंच असेल, तर बोलण्याची काहीतरी पद्धत असावी. ट्रोलर्स अगदी काहीही बोलतात, हे मला मुळीच आवडत नाही". 

English
हिंदी सारांश
Web Title : Kranti Redkar defends Sachin Pilgaonkar against trolls, expresses anger.

Web Summary : Kranti Redkar supports Sachin Pilgaonkar, criticizing trolls for disrespecting his legacy. She questions their authority to judge his statements, emphasizing his experience and urging them to listen respectfully. Redkar condemns the abusive nature of online trolling.
टॅग्स :क्रांती रेडकरसचिन पिळगांवकर